कौडंण्यपूर- भिम टेकडीचा प्राचीन इतिहास आणि 1956 चा धर्मांतर सोहळा
✍️ लेखक रवि दलाल
(आठवणीतले दिवस)
विदर्भाच्या वऱ्हाडी लोकांना प्राचीन काळापासून कौडंण्यपूर नगरीचे विशेष आकर्षण राहिले आहे. कित्येक पिढ्याचे लग्न याच बिहाडी टेकडीवर जुळले*. *जवळपास 300 वर्षापूर्वी लग्न जुळवणुक संस्कुती बिहाडी टेकडीवर सुरु होती,आणि 1990 पर्यंत टिकली. हजारो पिढ्यांचे लग्न बिहाडी टेकडीवरच जुळली विशेष म्हणजे माझ्या आईवडिलांचे लग्न देखील ठोमाजी जंगम (आंनद कुर्वे यांचा पंजोबा)यांनी महार टेकडीवर) आताच्या भीम टेकडीवर 1949 साली जुळून दिले होते यात्रा जवळ आली की पोरी पाहण्याच्या* *तारखा टेकडीवर ठरायच्या. आईवडिल वयात आलेल्या मुलांमुलींना हमखास यात्रेत घेवून यायचे.मुलगी इतर नातेवाईकांच्या नजरेत यावी आणि चांगलं स्थळ भेटावं हाच उद्देश असायचा म्हणून मुली पाहण्याचा कार्यक्रम सहसा महार टेकडीवरच पार पडायचा रात्री मनोरंजनासाठी गावांगावातून महार डिंढार, तमाशे रात्रभर चालायचे,पुलगावची सकवारबाई चा तमाशा* *आणि नांदपूरातील शंकर नाच्या, जहागीरपूर की हसनापूर मारोती महाराची,डंढार प्रसिध्द होती. पारडीचा दसऱ्या महार मारड्याच्या श्रावण मांगाची डिंढार त्याकाळात प्रसिद्ध होती*.
रात्रीच्या थंडीत लोक ताप करुन बसायची तर टेकडीच्या खाली ढोरांच्या मटनाचे गंज शिजनीला असायचे,तेव्हाचे लोक मनोरंजनाचे कार्यक्रम रात्रभर टेंभे पेटवून चालायचे.
पारडीच्या कानु सोनु पाटील पिपरीच्या दहाट,मारडीचे मोरे, भरोसे यांचे हले (आेगार )वर्धा नदीतून पखालीने पाणी आणून यात्रेकरुंना पुरवायचे.वर्धा नदीच्या मुख्य घाटावर महारांना पाणी भरण्यास आंघोळ करण्यास सक्त मनाई होती,म्हणून महार बाया माणसं नदिच्या खालच्या भागाला आंगधुणं करायचे, तेव्हाच्या सुधारीत महारांनी बिहाडी टेकडीच्या खाली होणारी ढोर कटाई बंद केली,त्यामुळे मटन शिजण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले.याच सुधारीत महारांनी पैसा देवून बिहाडी टेकडीवर विठ्ठल मंदीर उभारले होते.
कार्तिक पोर्णिमेला भरणारी कौडंण्यपूरची यात्रा ही मुक्कामी यात्रा होती. बैलबंडी छकडे, पेंडॉल,कपडे लत्ते ,ढोराचा चारा,कडबा कुटार ,तढव भाकरीच पिठ भगोने ,भांडे ताट वाटया दगडी वंरवटा, खलबत्ता घेवून यात्रेत तीन दिवस मुक्काम असायचा. लहान दुधावरच पोर असेल तर दुपधी गाय पण सोबत असायची असा यात्रेकरुचा बेडा यात्रेत मुक्काम ठोकायचा 300 वर्षापूर्वी वर्धा नदीवर पक्का पुल नसल्यानें बंडीची वहीवाट होती. नदी दुथडी भरुन असली तरी ब़ंडी टाकणे धोक्याचे असल्याने वरखेड,वऱ्हा, कुऱ्हा मार्गे किंवा जहागीरपूर मार्गे पुलगाव धामणगाव मार्गे बैलबंड्या कौडंण्यपूरात यायच्या. वर्धा जिल्ह्यातील बैलबंड्या रुद्रापूर,राजापुर विठ्ठलापूरच्या पाधंनीतुन रपट्या मार्गाने यायच्या. तातपुरता बनवलेल्या दगडी रपट्यावरुन पूरपाणी असेल तर त्यांना फिरुन जावं लागत असे.
प्राचीन काळी लग्न जुळवणुकीचं एकमेव ठिकाण महार टेकडी होतं. महारांचा ठिय्या महार टेकडीवर असायचा, तर इतर लोकांचा ठिय्या वर्धा नदीच्या खुल्या पात्राजवळ पडायचा. डोंगा बाटतो म्हणून भोई समाज महारांना डोंग्यात बसवत नव्हते,आणि ज्या डोंग्यात महार बसला त्या डोंग्यात इतर समाजाचे लोक बसत नव्हते, म्हणून रुदापूरच्या, विठलापूरच्या उंकड्या भरोसे आणि पंचु महाराने यात्रेकरुंसाठी नदीत डोंगा लावला होता.रुदापूर हे गाव जवळपास 250 वर्षापूर्वी उठले. ईटलापूरच्या बाजुला आजही रुद्रापूर गावाच्या अस्तित्व आणि खुना आहेत. तिथे दलाल आणि भरोसे दोन कुटुंब राहायचे. आम्ही दलाल मुळ रुद्रापूर गावचे आहोत.माझ्या,खापर पंज्याने रुदापूर सोडले आणि तिवस्यात येथे बसस्थान माडंले. तेव्हापासून दलाल तिवस्याचे झाले.माझा आजा सखाराम झुगलु दलाल यांचे लग्न कळासी गावच्या नागो पोपटकारच्या मुलींसोबत 1905 साली जुळले होते असे अनेकांची लग्न महार टेकडीवर जुळल्याचा मोठा इतिहास आहे, आणि ही प्रथा 1990 सालापर्यंत सुरु होती.
आता आपण भीम टेकडीचा पूर्व इतिहास पाहणार आहोत
(आठवणीतले दिवस) या कादंबरीत संपूर्ण माहिती लिहली आहे.
बिहाडी टेकडी आताची भीम टेकडी
👆👆👆👆👆👆
कौडंण्यपूरच्या विठ्ठल रुखमिनी मंदीराचा काल्पनिक इतिहास सांगायचा नाही.तो हिंदु शात्राच्या इतर पुस्तकांत वाचता येईल. प्राचीन काळातील बिहाडी टेकडी गिधाडी टेकडी म्हणजे आताची भीम टेकडी होय असा उल्लेख मिळतो.
(विदर्भ कन्या)लेखक बैलसरे- याच्या छोटेखानी पुस्तकात मिळतो. विहाराचा अपभ्रंश बिहाडी झाला असे जाणवते कारण उत्खनणांत अनेक स्तुप विहार, बुध्दशिल्प, अवशेष मिळाल्याचे नोंदणी पुरावे आहेत. इथे प्राचीन काळात विहार अस्तित्वात होते. 18 व्या शतकाच्या मध्यमात टेकडीला बिहाडी टेकडी असा उल्लेख व्हायचा. बिहाडी टेकडी झाटीझुडपी दाट झाल्याने टेकडीला बिहाडी टेकडी म्हटल्या गेले.
बिहाडी टेकडीच्या आजुबाजुला गावातील मेलेले ढोर फेकायचे, मांग,महार ढोरं उधळुन तिथे कातडी सोकवायचे, म्हणून गावाबाहेर गिधाडाची भरमार संख्या होती, म्हणुन त्या टेकडीला गिधाड टेकडी पण म्हणायचे.यामुळे टेकडीला अवदसा आली होती. गिधाडाचे झुंडी गावावर घिरटया घालायच्या आणि बिहाडीच्या टेकडीवर बसायचे.–बिहाडी टेकडी महारानी काही प्रमाणात चांगली करुन यात्रेत मुक्काम करायचे—- 1850 ते1863 च्या दरम्यान वहाॅडातील श्रीमंत महारांनी पुढाकार घेवून महार टेकडीवर विठ्ठल मंदीर बांधकाम करण्याचे योजले. पहिल्यांदा दगडी जोत्यांचे बांधकाम पारडीच्या सोनु मनवर पाटलाने केले. तिवसा येथील श्रीमंत गं.भा.बकाईबाई उद्राजी शापामोहन (बकाईबुढी)यांनी देखील महार टेकडीवर मंदीराचे बांधकामासाठी अनेकाचा हातभार लागला. बकाईबुढी च्या अनेक जनहिताय कामाची यादी माझ्या पुस्तकात मिळते. महार टेकडीवर मुळ मंदीरसोनु पाटील पारडी,
बकाई उद्रु शापामोहन तिवसा
उसाजी दहाट/पुसाजीदहाट
कौतवाल रायभान मात्रे
पिरकु गडलिंग,(वरखेड) यानी मुळ मंदिराचे बांधकाम केले (यामध्ये आणखी नावे असु शकते) तिथे विठ्ठल रुखमिनीची मुर्ती बसवली होती. नंतर बऱ्याच वर्षानंतर तिसऱ्या पिढीने पुढचा सभामंडप (हाॅल) सैब टाकुन बांधण्यात आला. नांदपूरच्या दलपत महार आणि त्याच्या सहकाराॅर्नी विठ्ठल रुखमिनीच्या मुर्ती आणल्या होत्या,त्या विठल रुखमिनी मुर्त्या भीम टेकडीवर 1990 साला पर्यंत होत्या आपण सर्वानी पाहिल्या आहेत. नंतर विठ्ठल रुखमिनी काढून तिथे भगवान बुध्दाची मुर्ती बसविण्यात आली. या महार टेकडीचे उत्खनन व्हावे यासाठी ईबाहिम खान,रवी दलाल आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी 1990 आणि 1992 साली दोन वेळा तिवसा ते कौडंण्यपूर सायकलने परिवर्तन यात्रा काढली होती. तेव्हा 9 मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या. पुरातनत्व खाते अमरावती येथे निवेदन सादर केल्याने 1990 साली भीम टेकडीचे उत्खनन माझ्या नजरे समोर झाले आहे.
(परीवर्तन यात्रेचे मुख्य आयोजक ईबाहिम खान तिवस्यातच आहे आपण पुष्टी करु शकता)
नंतरच्या काळात टेकडीचे नाव महार टेकडी झाले. खाली जंगल झुडपी साफ करुन अगदी सुरुवातीला (संत गाडगे महाराज) म्हणजे खापरे महाराजांचे किर्तन करायचे. तेव्हापासून महार टेकडीचा कायापालट झाला पण राष्टसंत तुकडोजी महाराज महार टेकडीवर आल्याचा उल्लेख कुठेच नाही पण
अमेरीकेची अभ्यासक ऐनिनार झेलिऐट,
भदंतआनंदकौसल्यानंद
पंडीत रेवाराम कवाडे
भंते सुमेध
भंते सुरई ससाई
भंते प्रज्ञानंद,
बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे
आवळे बाबु
रामरतन जानोरकर,
या प्रमुख राजकिय आणि बौध्द अभ्यासकांनी भीम टेकडीला भेटी दिल्याच्या नोंदी आहेत.
बिहाडी टेकडी नंतर -महार टेकडी आणि 1956 नंतर भीम टेकडी असे नामकरण झाले अशी ही बिहाडी टेकडी प्रवास करीत आता आधुनिक रुपात भिम टेकडी म्हणून ऊभी आहे.टेकडी सोबत महारांचा प्राचीन इतिहास जुळलेला आहे हे वाचकानी विसरु नये.
*क्रमशः*
उर्वरीत दुसऱ्या भागात 1956 साली बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या हस्ते महार टेकडीवर धर्मांतर सोहळा पार पडलेला होता याची सविस्तर माहीती पुढच्या लेखात.
लेखक रवि दलाल*
संकलन रवि लढे सर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत