निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

भाजपा आणि एकनाथ शिंदे पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांना “भयभीत” करत आहेत ?

👉 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत योजनांच्या नावावर महिलांना धमकवण्याचा प्रकार योग्य आहे का ?
👉 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वेठीस धरून दुसऱ्या बाजूला सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी योजना जाहीर केल्या आणि आज त्याच्या मोबदल्यामध्ये मत मिळवण्यासाठी महिला मतदारांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे ?
👉 विविध टीव्ही चॅनलवर जाहिरातीकडून मतदारांना ब्लूटूथ करत असताना निवडणूक आयोग गप्प का ?
👉 मतदारांपुर राजरोसपणे फसव्या जाहिराती दाखविल्या जात असताना, संसार बोर्ड भाषिक मंडळ निवडणूक आयोग गप्प राहते याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचे पॅकेज मिळाले आहे का ?

सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या कामाचा डंका वाजविण्यासाठी आणि काही लोक आम्ही खूपच इमानदारीने काम करत होतो.हे सांगण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अर्थात विविध टीव्ही चॅनेलचा लाखो करोडो रुपये चुराडा करून प्रचारासाठी वापर करत आहेत.संवैधानिक दृष्ट्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या राजकीय पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणे आणि आपण सरकार मध्ये असताना केलेल्या कामाची उजळणी करणार लोकांना ते सांगणं योग्य आहे.परंतु आपण केलेल्या विविध योजनांच्या नावाखाली मतदारांना भवित करणे हे “हुकूमशाहीचे” प्रतीक आहे.वास्तविक पाहता विविध टीव्ही चॅनल्स म्हणजे अतिशय माणसाच्या थेट मेंदूवर मारा करणारी चॅनल्स आहेत,ज्याचा यथोचित परिणाम निवडणुकीमध्ये पहावयास मिळेल. परंतु प्रचारादरम्यान काही संवैधानिक मूल्यांना सुद्धा मूल्यांची जोपासना सुद्धा करणे अत्यंत गरजेचा असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील महिलांना वेठीस धरून डायरेक्ट “महिलांना धमकावण्याचा” धमकावण्याचे काम करत आहेत.ही बाब या पुरोगामी महाराष्ट्राला काळी माफ असणारी आहे.तसेच महाराष्ट्रातील महिला शक्तीला नाकारून तिचा अपमान करणारी सुद्धा आहे.हे आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.

विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर विविध टीव्ही चॅनल वरती जाहिरातीच्या माध्यमातून मतदारांना भयभीत करण्यात येत आहे.याच्या विरोधामध्ये स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी समजणाऱ्या राजकीय पक्ष,संस्था,संघटना यांच्या विविध कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे.एकनाथ शिंदे शिवसेना ही योजना दिल्याच्या मोबदल्यामध्ये मत मिळवण्यासाठी जाहिराती करत आहेत,तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी सुद्धा महाराष्ट्रातील महिलांना दिलेल्या योजनेच्या मोबदल्यामध्ये “मतं” देण्यासाठी “धमकावत” आहे.हे बाब महाराष्ट्रातील महिला वाघाने का सहन करावी हा मोठा प्रश्न आहे.

ज्यावेळी पासून विधानसभा निवडणुकीचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरुवात झालेली आहे.या प्रचारामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिवसेना,उद्धव सेना या प्रस्थापित आणि मुजरा राजकीय पक्षांच्या वतीने करोडो रुपयाचा चुराडा करत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अर्थात विविध टी.व्ही चॅनल्स वरती जाहिराती पक्षाच्या जाहिराती करण्यात येत आहेत.या जाहिरात बाजी मध्ये भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे शिवसेनेने भरारी घेतली आहे.

मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये शिवसेना फोडून आलेले काही आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस मधून निघालेले अजित पवार यांनी जे सरकार स्थापन केलं,या सरकारच्या जवळपास दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला पैशाचे प्रलोभन दाखवत वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या. त्या योजना काही प्रमाणामध्ये प्रत्यक्षातही उतरविल्या,ज्यामध्ये तीन गॅस योजना,लाडकी बहीण योजना,पर्यटन योजना,इत्यादी काही बोटावर मोजण्या इतक्या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्या आणि थोडाफार त्याचा लाभही दिला.

त्याप्रमाणे आज विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदारांना भ्रमित करण्यासाठी उपरोक्त प्रकारच्या योजनांच्या जाहिराती केल्या जात आहेत.ज्या जाहिरातीमध्ये मुख्यत्वे महिला आपआपसात बोलताना दिसतात की,आपल्याला मागच्या सरकारने….ही योजना दिली,परंतु हे जर सरकार बदललं तर आपल्याला मिळालेल्या योजना ही बंद होतील,त्यामुळे आपण आपल्याला योजना देणाऱ्या सरकारला मतदान करायचं….अशा स्वरूपाच्या जाहिराती सध्या विविध टीव्ही चॅनल्स वरती करोडो रुपये खर्च करून करण्यात येत आहेत.

वास्तविक आता विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रचाराच्या रण-धुमाळी मध्ये डायरेक्ट मतदारांना धमकविण्याचा,त्यांना भयभीत करण्याचा,त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार आज राजरोसपणे इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून करण्यात येत आहे. एखाद्या उमेदवाराच्या बाबतीत चुकीचा प्रचार करणे,चुकीचे मेसेज देणं,चुकीच्या गोष्टी जाहीर करणे, जातीच्या आणि धर्माच्या आधारावर प्रचार करणे इत्यादी अनेक प्रकार निवडणुकीमध्ये होतच असतात. परंतु आज या विधानसभा निवडणुकीमध्ये मुळात ज्यांचे सरकार स्वतःची स्वतःचे पद,सत्ता, संपत्ती वाचविण्यासाठी स्वतःच्या मालकाशी बेईमानी करून भारतीय जनता पार्टी सोबत सरकार स्थापन करतात.ती मुजोर पैसेवाली मंडळी प्रत्यक्ष निवडणूक काळातही थेट मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांना “भयभीत” करण्यासाठी,भीती दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या जाहिराती करून, योजनेच्या नावावर “मतं” मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

तर दुसरी महत्त्वाची आणि वास्तविक बाब अशी आहे की, भारतीय जनता पार्टी,एकनाथ शिंदे शिवसेना यांच्याकडून अशा प्रकारच्या जाहिराती करण्यात येत असताना सुद्धा महाराष्ट्र निवडणूक आयोग,सेन्सर बोर्ड, 2013 चा कायदा, भाषिक मंडळ इत्यादी जबाबदार मंडळी मात्र मूग गळून गप्प का बसलेली दिसत आहे ? याचा अर्थ असा होतो की,या सरकारी यंत्रणासाठी सुद्धा निकोप लोकशाही महत्त्वाची नसून भारतीय नागरिकांना गुलामीच्या झोकात झोकून देणारे भारतीय जनता पार्टी आणि मुजोर पैसेवाली माणसंच सरकारमध्ये पाहिजे आहेत किंवा खूप मोठं “गबाळ” या लोकांना भारतीय जनता पार्टी कडून मिळालं असावं,असे ही प्रत्येक सुज्ञ “मतदार” नागरिकाला वाटत आहे.

त्यामुळे महाराष्ट्र निवडणूक आयोग, प्रत्येक ठिकाणचे जिल्हाधिकारी, एस डी एम,तहसीलदार, लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष संस्था आणि संघटना जर या विरोधात काय बोलणार नसतील,भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या या मुजोर प्रचाराला जर रोखण्यात अपयश त्यांना येत असेल,तर खुद्द सर्वसामान्य नागरिकांनी, मतदारांनी या जाहिरातींच्या विरोधामध्ये उतरला पाहिजे आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीला चांगला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील तिसरा पर्याय असलेल्या फुले,शाहू,आंबेडकरवादी शक्तीचा स्वीकार करून “वंचित बहुजन आघाडीला” सहकार्य करणे क्रमाप्राप्त ठरते.

विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक
भीमनगर,नागेश नगरी उस्मानाबाद
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!