मतदानाच्या आदल्या रात्री पैसे आणि मटण घेतलं तर काय होतं ?
( या पोस्टमधली भाषा उग्र आहे. पण यापेक्षा सभ्य भाषेत समजावून सांगता येते का हे सांगा. सभ्य भाषेत सांगितले तर आजवर कुणाचे हृदयपरिवर्तन झाले ते सांगा)
उमेदवार जे पैसे देतो ते अजिबात चांगल्या मनाने देत नाही. जे मटण देतो ते ही चांगल्या मनाने देत नाही. आता बोकड किंवा चिकन तर जिवानिशी जात असते. तरी पण निसर्गाने गरज असेल तर अन्नसाखळी म्हणून दुसर्या जिवाची हत्या उदरभरणासाठी मान्यच केलेली आहे. चैनीसाठी नाही. मत विकण्यासाठी तर अजिबात नाही.
उमेदवार जे पैसे वाटतो ते काळ्या धंद्यातून आलेले असतात. म्हणजेच अशा काळ्या धंद्यात त्याचा सहभाग असतो. काळे धंदे करण्यासाठी गुन्हेगार पाळावे लागतात. गुन्हेगार जर उमेदवारासाठी काम करत असतील तर पुढे त्यांच्या काळ्या धंद्यांना उमेदवार आळा घालूच शकत नाही. उलट त्यांना वाचवावे लागते.
याच काळ्या धंदेवाल्यांचा तुमच्याबद्दलचा ग्रह पैसे घेऊन मत विकले म्हणजे हा आपला गुलाम झाला असा होत असतो. त्यातून तुमच्यावर काहीही अन्याय केला तरी याने तोंड उघडता कामा नये असे त्याला वाटते. छोट्या छोट्या कारणावरून दलितांच्या हत्या होण्यामागे हेच कारण आहे. तुमच्या मुलांच्या हत्या किरकोळ कारणावरून होतात कारण तुमची पत तेव्हढीच आहे असे यांना वाटते. तुम्ही मत विकले म्हणजे आता तुम्हाला लोकशाहीत स्थान नाही. पोलिसांनी तुम्हाला न्याय का द्यावा असे यांना वाटते. पोलिसांचाही तुमच्याबद्दल हाच ग्रह असतो.
एकदा पैसे घेऊन, मटण खाऊन मत विकण्याने तुम्ही अशा सर्वांच्या मनात आपली लायकी कापल्या जाणार्या बोकडासारखी आहे हे ठसवत असता. त्या बोकडाचा तळतळाट सुद्धा लागलेला असतो. कारण त्याचा जीव तुमच्या मत विकण्यासाठी नाहक गेलेला असतो. अशात तुमच्या मुलाबाळांचा जीव जर त्याच गुंडांनी किरकोळ कारणावरून घेतला तर कुणालाही बोल लावू नयेत. विकले ना मत ? आता शांत बसा.
वाईट इतकेच वाटते, तुमच्या अशा वर्तनाने समाजाच्या इतर प्रामाणिक लोकांनाही त्याच चष्म्यातून पाहिले जाते. त्यांचाही जीव गेल्यावर न्याय मिळत नाही, ते तुमच्या विकाऊ पणाने.
अर्थात तुमच्यापेक्षाही जास्त गुन्हेगार ते लोक आहेत जे बाबासाहेबांच्या कृपेने शिकले, सरकारी नोकरीत गेले आणि विकले गेले. त्यांनी नुसते मतच नाही विकले तर चळवळच दावणीला नेऊन बांधली. त्यांनी लोकांची मतं फसवून शत्रूला दिली. अशांचा जेव्हां बोकड होईल तेव्हां कुणीही न्यायासाठी मोर्चे काढू नयेत. एका ओळीची श्रद्धांजलीही देऊ नये. न्यायाची मागणी सोशल मीडीयात सुद्धा करू नये.
विकले गेलेल्या गद्दारांबद्दल जमल्यास बरं झालं मेला इतकीच प्रतिक्रिया देता आली तर आनंदच होईल. ज्यांच्याकडे त्यांनी आपली सम्यक बुद्धी विकली त्यांनी गरीबांच्या बाबत जे केलं तेच केलं तर अनेक गद्दारांना चांगलाच धडा मिळेल. गद्दार गद्दारच असतो. त्यामुळे गद्दारी करून तो जिकडे गेला तिथेही गद्दारीच करणार. त्याचे परिणाम काय होणार हे सांगायला कशाला पाहीजे ?
- Mandar Mane सरांच्या वॉल वरून
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत