निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

आम्ही निर्धार केला पक्का,भाजपला देउ धक्का!!!

भारतातील सर्व संविधानप्रेमी अर्थात स्वातंत्र, समता, बंधुता व न्याय माननारी आंबेडकरवादी जनता भाजपाचे केंद्रात आणी अनेक राज्यात त्यांचे सरकार आल्यावर अनुभव केला आहे की या सरकारनी केंद्रात आणी राज्यात भारतीय संविधानातील स्वातंत्र, समता, बंधुता व न्याय या तत्वाला पायदळी तुडविले आहे. असे नाही की यापुर्वीचे काॅंग्रेस सरकार हे नामानिराळे होते, त्यांनी सुध्दा आमच्यावर अनेक अन्याय केला, आमच्यावर सामाजिक अन्याय करणार्‍यांची काही ठीकाणी पाठराखण सुध्दा केली. परंतु न्यायालयात दाद मागितल्यास न्याय मिळण्याची थोडीफार उम्मीद होती. तसेच त्यांनी शिक्षा, स्वास्थ, रोजगार यावर कार्य केले म्हणुनच भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी झिरो असणारा अनु. जाती, अनु. जमाती आणी ओबिसी समाज शिक्षण घेउन वेळवेगळ्या पदावर कार्यरत आहे, त्यांनी आपला आर्थिक व सामाजीक दर्जा उंचावला आहे. यामुळे समाजात असणारी जातीभेदाची दुरी ही काहीअंशी कमी होउ लागली व समाजात बंधुभाव वाढु लागला. परंतु भाजपाचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासुन त्यांनी सर्वप्रथम शिक्षा, स्वास्थ, रोजगार यावर हल्ला करुन विज्ञानवादी शिक्षण देण्याऐवजी वेदोप्रणीत अंधश्रध्दा व कर्मकांडी शिक्षण देणे सुरु केले. सरकारी दवाखान्यातील सोयी सवलती अपुर्‍या व घातकी केली याचा अनुभव करोना काळात वापरलेल्या लसचा सगळ्यानांच येत आहे.
सरकारी संस्थाने खाजगी भांडवलदाराना देत असल्यामुळे रोजगाराची संधी नाहीशी झाली. गेल्या दहा वर्षापासुन अनु. जाती, अनु. जमाती आणी ओबिसीचे तरुण सरकारी नोकरीवर लागण्याचे प्रमाण भयानक कमी झाले परंतु लॅटरल पोस्टींगच्या नावावर ब्राम्हणाचा भरणा भारत सरकारच्या महत्वाच्या पदावर चालु आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर स्वार्थी आंबेडकरी नेते एकजुट न झाल्याने त्याचा फायदा वेगवेगळ्या सत्ताधारी पक्षाने त्यांच्यापुढे भिकेचे तुकडे टाकुन घेतला.
परंतु आजपर्यंतची काॅंग्रेसच्या काळातील लढाई ही भारतीय संविधानाच्या उचित अंमलबजावणीसाठी होती तर आता ही लढाई भारतीय संविधानाचे अस्तित्व वाचविण्यासाठी आहे. त्यामुळे आपली लढाई आता ही भारतीय संविधानाच्या अस्तित्वासोबतच आपल्या जिवनमरणाची आहे त्यामुळे आता आपले सर्व तथाकथित आंबेडकरी गटतट एकत्र येउनभाजपा आणी काॅंग्रेसच्या विरोधात एकच उमेदवार दिल्यास सर्व शक्ती लावुन त्यांना जिंकण्यासाठी समाज शर्थीचे प्रयत्न नक्कीच केले असते. परंतु अशा अटीतटीच्या वेळी सुध्दा आपले स्वार्थी नेते आपआपले स्वतंत्र अस्तिव सिध्द करण्यासाठी भाजपा आणी काॅंग्रेसच्या विरोधात आपले अनेक उमेदवार उभे केले. सुज्ञ संविधानप्रेमी आणी आंबेडकरवादी जनता ही भाजपला मत देणार नाही हे नक्की आहे परंतु भाउबंदकी, मित्रता, समाजबांधव, जाती, धर्मप्रेम, गटातटावरील आसक्ती यामुळे भाजपाविरोधी मताचे विभाजन होउन भाजपला हरवु शकणार्‍या उमेदवाराची शक्ती क्षिण होईल व भाजप जिंकण्यास मदत होउ शकते. परंतु सुज्ञ जनता पुढे असणारा संविधानिक धोका ओळखुन केवळ भाजपला हरविणार्‍या उमेदवारालाच मत दिल्यास भाजप परास्त होउन किमान राज्यात तरी संविधान वाचविण्याचा इवलासा प्रयत्न होउ शकतो. त्यामुळे सुज्ञ जनतेनी कोणाच्या भुलथापीला बळी न पडता भाजपा विरोधी मताचे विभाजन टाळण्यासाठी भाजपला हरवु शकणार्‍या उमेदवारालाच मत द्यावे.
धन्यवाद!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!