दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये. जरा इतिहास वाचत चला…

समाज माध्यमातून साभार

पहिले कारण:- तथागत भगवान बुद्धांच्या श्रावक संघाचे दोन श्रेष्ठ सोबती सारीपुत्त सेनापती आणि महामोग्गलायन हे उपसेनापती होते. या दोघांचा असीम त्याग आणि ४४ वर्षाची धम्मसेवा आणि त्यांच्या अंगी असलेले सद्गुण यामुळेच तथागतांनी त्यांच्यावर संघाची दूर सोपविली होती. महामोग्गलायनचा प्रभाव राजगृहामध्ये खूप वाढला. त्यामुळेच कार्तिक अमावास्येला ईसीगल पर्वतावर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. महामोग्गलायनला जिवंत जाळण्यात आले. तो दिवस दिवाळीचा होता. म्हणजेच इतिहासातील काळा दिवस.

दुसरे कारण:- मौर्य काळातील दहावा सम्राट बौद्ध राजा बृह्दरथ हा दहा व्यक्तींचे बळ असलेला महापराक्रमी अजिंक्य योद्ध होता. युद्धात त्याला हरविणे कठीण काम होते. यांची ब्राम्हणी सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपट कारस्थानाने क्रूर हत्या केली. तोही दिवस कार्तिक अमावस्येचा होता. बौद्ध सत्ता उलथून लावण्यात आली. भिक्खुंच्या कत्तली करण्यात आल्या. भिक्खुंचे शीर कापून आणणाऱ्यास (१००)सुवर्ण मुद्रा देण्याचे फर्मान पुष्यमित्र शुंग याने सोडले. विहारे, स्तूप नष्ट केली आणि दिव्यांच्या माळा लावून आतिषबाजी केली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा (दिवाळी) होता.

तिसरे कारण:- “ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो” हि म्हण आजही आपल्या माता-भगिनी एखाद्या प्रिय व्यक्तीला ओवाळताना म्हणतात. यामागे फार मोठा इतिहास आहे. बहुजनांचा सर्वश्रेष्ठ राजा बळी हा अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, सत्वशील, चारित्र्यवान, उदार, दयाशील, न्यायी असा सर्वगुण संपन्न राजा होता. त्याच्या राज्यात सर्वसामान्य बहुजन समाजातील जनता अत्यंत सुखी-संपन्न व समृद्ध होती. अशा या दानशूर बहुजन राजाला विष्णूने कपटकारस्थान रचून कैद केले. त्यांची सत्ता, शास्त्रे, विद्या, संपत्ती हिरावून घेण्यात आली. त्यांच्या मुलांना एकामागून एक ठार करण्यात आले. बलीप्रतीपदा या दिवशी बळी राजाची क्रूर हत्या करण्यात आली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा म्हणजेच (दिवाळी) चा होता.

म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. आजवर आपण जे काही करत आलो त्यात आपले अज्ञान होते. परंतु आता तर आपल्याला खरा इतिहास समजलेला आहे आणि हा खरा इतिहास समजून देखील आपण जर परत तीच चूक करत असाल तर मात्र आपल्याला बौद्ध म्हणवून घेण्याचा काही एक अधिकार नाही. कारण; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देत असतांना त्यांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा देखील दिलेल्या आहेत. जर आपण त्या २२ प्रतीज्ञांचे पालन करत नाहीत तर याचा अर्थ स्पष्ट आहे कि आपण आपल्या उद्धारकर्त्याशी बेईमानी करत आहोत. त्यांचा अपमान करत आहोत व आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत आहोत. म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. घरावर विद्युत रोषणाई करणे, आकाश कंदिल लावणे, दिवे लावणे, रांगोळी काढणे, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या, महापुरुषांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा केल्यासारखे होईल. आपण बौद्ध आहोत. आपली संस्कृती वेगळी आहे. आपले सण म्हणजे भिमजयंती, बुद्धजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, व आपल्या आदर्शांच्या जयंत्या व प्रत्येक महिन्याची पोर्णिमा हे आहेत. तेच फक्त साजरे करावेत…#

आपल्या घरात जर कुणाचा मृत्यू झाला तर आपण
नवीन कपडे घालतो काय …?
अंगणात रांगोळी काढतो काय …?
घराच्या दाराला आकाश कंदील लाऊन लायटिंग करतो काय ……?
घरात , दारात , अंगणात दिवे लावून आणि घरात आपण फराळ बनवून आनंदोत्सव साजरा करतो काय….?

नाही ना…………..!

मग आपण दिवाळी साजरी का करतो …………?
आपण कधी ह्याचा विचार केला का

मग आपण आपल्या पूर्वजांच्या हत्येचा दिवस का साजरा करतो ….?

ह्याचा आपण का विचार करत नाही ….!

ब्राह्मणाच्या अघोरी कृत्यात आपण आनंदाने का सामील होतो ….?

का ….

का…….?

जागे व्हा दिवाळी आपला सण नाही आहे …?
.
🙏🙏..कृपया हा मॅसेज सर्व जय भिम बुद्ध अनुयायी कड़े पोहचवा. त्यांना पण जागे करा जे बौध्द धम्मात राहून सुध्दा दिवाळी हा सण साजरा करतात..🙏🙏

🌷…जय भिम….#…नमो बुध्दाय…🌷

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!