होळकरांची कैफियत
गद्दार #चंद्रचूड
समाज माध्यमातून साभार
“धुणीपाणी सरली असल्यास, मोगलाईची चाकरी करु, अगर फिरंग्याची करू, पाहिजे ते करू, पण ब्राम्हण म्हणतील दौलतीचा अभिलाष करु, तर ते होऊ देणार नाही”_ महाराणी अहिल्याबाई होळकर
कोल्हापूरचे रावबहाद्दुर महादेव बर्वे, दिवाण दाजी पंडित, सातारचा दिवाण बाळाजीपंत नातू यांच्या जोडीला आणखीन एक विश्वासघातकी नाव म्हणजे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड, इंदुरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मृत्यू नंतर दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड याने बराच घोटाळा करून पैसा दाबून ठेवला होता_
ही गोष्ट थोडीफार महाराणी अहिल्याबाई साहेब होळकर यांच्या लक्षात आली. तेव्हा दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड याने पेशव्यांचा चुलता रघुनाथराव दादा पेशवा याला पत्र पाठवून “ही दौलत बैतलमाल झाली दरमजल येऊन दौलत समेटावी” असा निरोप पाठवला. रघुनाथराव दादा याला ही तोंडाला पाणी सुटल त्याने जवळपास ५० हजाराची फौज घेऊन इंदुरचा रस्ता धरला_
याची खबर शिवाजी गोपाळ, राजाराम रणसोड या कारभाऱ्यांना समजताच त्यांनी महाराणी अहिल्याबाई साहेबांच्या कानावर घातली.
तेव्हा महाराणी अहिल्याबाई साहेबांनी नागपूरकर भोसले, बडोदेकर गायकवाड, दाभाडे यांच्याकडे पत्र पाठवून सैन्य पाठवावे. अशी मागणी केली_
यात महाराणी अहिल्याबाई म्हणतात_ “ब्राम्हणाने हरामखोरी आरंभली आहे. आमच्या वडिलांनी भांडभवई करून दौलत मिळवली नाही, तर तलवारीचे अनुमाने शरीर खर्च घातले आहे. आता धुणीपाणी सरली असल्यास मोगलाईची चाकरी करू अगर फिरंग्याची करू पाहिजे ते करू, पण ब्राह्मण म्हणतील दौलतीचा अभिलाष करू तर ते होऊन देणार नाही” पुढे इशारा देऊन महाराणी अहिल्याबाई म्हणतात,
“त्यास आमचे जसे असेल तसे आम्ही भोगू, परंतु आज आम्हावरी, उद्या तुम्हावरी हीच गोष्ट आहे. याचा विचार करून फौज मदतीस पाठवावी”_
पत्रे पोहचताच गायकवाड, भोसले, दाभाडे यांच्या फौजा येऊन नाक्यावर थांबल्या सहाव्या दिवशी तुकोजी होळकर फौजेसह इंदुरला आले. सुभेदारांच्या राज्याचा घात करता अशी हमराई तुमराईची पत्र वरकड सरदारांनी माधवराव पेशव्यांच्या दरबारी पुण्यास पाठवली_
प्रकरण जड होताच रघुनाथराव दादा याने पत्र पाठवून आपण सांत्वन करण्यासाठी इंदुरला येत आहे. अशी सारवासारव केली_
तेव्हा तुकोजी होळकरांनी म्हटलं_
“सांत्वनासाठी येताय तर फौज कशाला.? पालखीत बसून या असं सांगितल. तेव्हा रघुनाथराव दादा पालखीत बसून इंदुरला आला सर्वांना मिळून एक ताट व पाच वाटी भोजन होळकरांनी घातले रघुनाथराव दादा निघून गेल्यावर सर्व फौजा पाठोपाठ निघून गेल्या.
पुढे नवा दिवाण नेमून द्यावा अस होळकरांनी सांगितले. तेव्हा तुम्हाला जो पसंत पडेल तो नेमावा, अस माधवराव पेशव्याने सांगितले.
पेशव्यांची इज्जत गेलेली बघून माधवराव पेशव्याने दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड, मेहुणा बाजी विठ्ठल, सखुभट व जिवाजीदादा यांना अटक करून पुण्यात कैदेत ठेवले. दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड याला ३० लाखाचा दंड ठोठावला. तर चौघांच्याही मुसक्या आवळल्या, पायात बेड्या घालून भर चौकात छड्या मारल्या. छडीच्या माराने गंगाधर यशवंत चंद्रचूड याच्या पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडल्या, कानाला चाप लावले बाजी विठ्ठल याला मोजून ३०० छड्या मारल्या व गारद्यांच्या हवाली केल. अशाप्रकारे होळकरशाही बुडवायला चाललेल्या हरामखोरांचा निकाल लागला.
संदर्भ _ होळकरांची कैफियत
Page. 42 to 54
“धनंजय यशवंत चंद्रचुड़” याचे पूर्वज “गंगाधर यशवंत चंद्रचुड़” याला पेशव्यांनी होळकरांकडे दिवाण म्हणून नेमले होते.
“गंगाधर यशवंत चंद्रचुड़” याने होळकर बरोबर गद्दारी केली होती.
माधवराव पेशवें यांनी “गंगाधर यशवंत चंद्रचूड़” याला चाबकाने फोडून वर 30 लाख रु दंड केला होता.
fbpost2024 #highlightseveryone #मराठीstories #viralpost2024 #everyonehighlights #मनोजजरंगेपाटील #मराठा #maratha96k #marathaempire #maratha #MarathaReservation #MarathaReservationProtest #पेशवा #पेशवाई #शिवशाही #शिवाजी #महाराज #shivajimaharaj #होळकर #अहील्यामाता #fbpost #fb #explorepage #explore #exploremore #maharashtra
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत