_बुद्धांची शिकवण

मानवाच्या कल्याणाचा मार्ग
१)मूर्खांच्या सहवासापासून दूर राहणे , सुज्ञांची संगती धरणे व पूज्यजनांची पूजा करणे. हे उत्तम मंगल होय.
२) अनुकूल प्रदेशात वास्तव्य, पदरी पुण्याचा साठा आणि सन्मार्गात मनाला गुंतविणे. हे उत्तम मंगल होय.
३) विद्या संपादन कला संपादन सदवर्तनाची सवय व चांगले भाषण. हे उत्तम मंगल होय.
४) आई-बापांची सेवा, बायको मुलांचा सांभाळ आणि व्यवस्थितपणे केलेले कर्म.
हे उत्तम मंगल होय.
५) दानधर्म, धार्मिक आचरण, नातलगांना मदत व प्रशस्त कर्मे. हे उत्तम मंगल होय.
६) पापा पासून पूर्ण निवृत्ती, मद्द्यपानापासून संयम आणि धार्मिक कृत्यात दक्षता.
हे उत्तम मंगल होय .
७) आदर, नम्रता ,संतुष्टी,कृतज्ञता आणि वेळोवेळी सद्धर्म श्रवण करणे.
हे उत्तम मंगल होय.
८) क्षमाशांती, गोड भाषण, श्रमनांचे दर्शन व वेळोवेळी धम्मचर्चा.
हे उत्तम मंगल होय.
९) तप, ब्रह्मचर्य, आर्यसत्यांचे ज्ञान आणि निर्वाणाचा साक्षात्कार.
हे उत्तम मंगल होय.
१०) लोक स्वभावांशी प्रसंग आला असता ज्याचे चित्त अस्थिर होत नाही, पण शोकरहित, निर्मळ व सुखरूप राहते .
हे उत्तम मंगल होय.
११) अशा मंगलाचे आचरण करून कोठेही पराभव न पावता जे स्वस्तिसुख मिळवतात.
हे उत्तम मंगल होय.
_ संद्दर्भ( बौद्ध पूजा पाठ) डॉक्टर बी आर आंबेडकर
🙏🙏
मिशन _ EFFECTIVE DHAMMA EDUCATION
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत