उघड शत्रूपासून सावध रहा हे सांगण्याची गरज पडत नाही.
आंबेडकरी चळवळीतले लोक भोळे असतात. भावनिक असतात.
कालच संभाजी ब्रिगेडच्या झालेल्या फसवणुकीबद्दल श्रीमंत कोकाटे यांनी पुरोगामी चळवळी भोळ्या असतात असे विधान केले.
नेमका याचाच फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेसारखे लबाड लांडगे घेत असतात. हे कोणत्या ऍंगलने पुरोगामी आहेत हे त्यांच्या बापजन्मात सांगता यायचं नाही. यांनी स्वत: सांगितलं कि आम्ही पुरोगामी आहोत तर त्यांना स्वत:ला सुद्धा हसू येईल. पण तरी पण हा पुरोगामी खेमा आहे असं पर्सेप्शन कसं तयार झालं ?
त्याची दोन कारणे आहेत.
पहिलं म्हणजे त्यांनी स्वत:ची शुभ्र रंगात धुलाई केलेली नाही, तर आपल्या मळलेल्या राखाडी सदर्याच्य बाजूला काळ्याकुट्ट तेलात , चिखलात भरलेला सदरा घातलेला मनुष आणून बसवला. त्यामुळे यांचा मळलेला सदरा स्वच्छ, शुभ्र दिसू लागला आहे.
भाजपला कॉंग्रेसने भरमसाठ प्रसिद्धी दिली आणि आपल्या दोघांच्यात वैर असल्याचे सांगितले. भाजपने आपली बाजू धर्मांधतेची असल्याचे जाहीर केले. आजच्या पुरोगामी व्याख्येप्रमाणे जे जे पुरोगामी सदरात मोडत नाही ते ते भाजपने आपलेसे केले. यामुळे भाजपच्या या सर्व गोष्टींना विरोध करणे म्हणजेच् पुरोगामित्व असा समज तयार झाला. त्यासाठी पुरोगामी विचारधारेवर प्रत्यक्षात चालण्याचे कारणच नाही.
भाजपच्या नावावर गुजरात दंगलींच्या माध्यमातून एव्हढे कौर्य रजिस्टर केले गेले कि कॉंग्रेस आणि शिवसेनेने मिळून घडवलेल्या मराठवाडा, मुंबई दंगली त्यापुढे अहिंसक आंदोलने वाटाव्यात.
लोकांपुढे त्यांनी भाजपचा चेहरा हा एका क्रूर श्वापदाप्रमाणे पेश केला आणि हळूच मग त्यांना विरोध करणार्यांची तुलनेने कमी क्रौर्य असलेली पापे माफ केली जावीत असा नरेटिव्ह मांडला. लेस एव्हिल चालवून घ्या असा पर्स्पेटिव्ह तयार केला गेला.
दुसरे कारण म्हणजे..
ऑथेंटिकेशन.
मविआला पर्सेप्शन तयार करण्यासाठी व्हॅलिडेशन हवं होतं. त्यांच्या प्रचाराला ऑथेंटिकेशन हवं होतं. म्हणून त्यांनी समाजात पेरलेल्या विद्वान, विचारवंत, रंगकर्मी, सेलेब्रिटी यांना २०१४ पासून आधी भाजपच्या विरोधात कामाला लावले. मग पुरोगामित्व म्हणजे काय याच्या व्याख्या करायला सुरूवात केली. या व्याख्या आंबेडकरी विचारधारेपेक्षा भिन्न होत्या. पातळ होत्या.. आंबेडकरी विचारधारेच्या पुरोगामी व्याख्या या कट्टर आहेत असे आडून आडून सुचवायला सुरूवात केली.
ज्या ज्या गोष्टींना आंबेडकरवाद्यांकडून विरोध होतो, त्याला थेट आंबेडकरवाद्यांना उत्तर देण्याऐवजी, आंबेडकरवाद्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी त्यांनी लेली बोले सुने लागे हा प्रकार निवडला. आंबेडकरवाद्यांचा गांधीजींना विरोध आहे तो राउंड टेबल कॉन्फरन्स आणि पुणे करारावरून. त्याला परिस्तउत्तर देण्याऐवजी भाजपने गांधीजींना विरोध करायचा आणि कॉंग्रेसने त्यांना विरोध करताना गांधीजींच्या विरोधकांची इमेज ही खूनी करून ठेवायची हा खेळ सुरू केला. यात अर्थातच भाजप सहभागी होती. गांधी विरूद्ध गोडसे हा वाद खेळायला यांना कंटाळा येत नाही. मात्र पुणे कराराबद्दल बोलले कि यातले काही विद्वान तुम्ही अजून १९३० च्या दशकातच अडकला आहात असे संभाविताप्रमाणे सल्ले देत असतात.
अशा पद्धतीने गांधी नेहरू आणि कॉंग्रेसला विरोध करणारे हे प्रतिगामी, विकृत, हिंसक असतात असा नरेटिव्ह पसरवून गांधी, नेहरू आणि कॉंग्रेस यांचे मनवतावादी लार्जर दॅन लाईफ शाब्दीक पेंटींग सेट केले गेले.
आता या परिस्थितीत दोनच पक्ष उरले.
एक काळा दुसरा पांढरा. तुम्ही पांढर्यासोबत नाहीत तर काळ्यासोबत आहात हा नरेटिव सेट झाला.
आता पुणे करार, गोलमेज परीषद यांना उत्तरं देण्याची गरज नव्हती. कुणी प्रश्न विचारलाच तर तुम्ही भाजपची बी टीम म्हटले कि संपले.
या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाहीतच. पण प्रश्न विचारणे म्हणजे भाजपला मदत करणे हा लोकशाहीचा खून आहे हे का सेट झाले ?
कारण यांनी विकत घेतलेले विद्वान, विचारवंत, सेलेब्रिटी, रंगकर्मी, बुद्धीजीवी यांची संमती याला आहे. ते कॉंग्रेस आघाडीला प्रश्न विचारत नाहीत. इतरांना विचारू देत नाहीत आणि जे विचारतील त्यांच्या अंगावर धावून जात आहेत.
२०१४ पासून या मंडळींनी खर्ड्यातल्या प्रकरणात आंबेडकरवाद्यांना सहानुभूती दिली कारण कॉंग्रेस काही येत नाही हे ठाऊक होते. त्यानंतर मात्र त्यांनी आंबेडकरवाद्यांना सहानुभूती देताना कॉंग्रेसच्या राज्यातली प्रकरणे टाळली. फक्त भाजपच्या राज्यातल्या प्रकरणांवर फोकस ठेवला. त्यातून आंबेडकरवादी पक्षांना फोडणारे नेते तयार केले गेले. त्यांना थोपवण्याचा प्रयत्न झाला.
राजस्थानातले मटका प्रकरण असो कि महाराष्ट्रात राष्ट्रवादी + कॉं च्या काळात झालेली ४५०० प्रकरणे असोत कि अडीच वर्षाच्या मविआ च्या काळातल्या अकरा हत्या आणि अनेक बहीष्काराची प्रकरणे असोत, त्यांनी ते आपल्याला ऐकू येत नाही, दिसत नाही ही भूमिका घेतली. म्हणूनच त्यांना या प्रकरणात बोलता येत नव्हते.
त्याच वेळी भाजपप्रमाणे आंबेडकरवाद्यांना एकटे पाडून त्यांच्या न्याय्य बाजू दडपून त्यांचे खलनायकीकरण केले जाईल हा अंदाज बांधला होता तो सत्यात आला.
आता सावरकरांप्रमाणे बाबासाहेबांचे चारित्र्यहनन होणार ही भीती आहे. सावरकरांवर कॉंग्रेस अनेक वर्षे गप्प होती.आता सावरकर विरूद्ध कॉंग्रेस यांच्यातला वैचारीक वाद काय यावर बोललेच जात नाही. आंबेडकरवाद्यांना सावरकरांशी काहीच घेणं देणं नाही त्यामुळे ते कॉंग्रेसवाल्यांना सपोर्ट करतात. पण कॉंग्रेसच्या मनात काय आहे ?
सावरकरांवर ते ट्रायल घेत आहेत. उद्या याच मेथडने बाबासाहेबांना कायमचं व्हिलन बनवता येईल का हे ते बघत आहेत.
अरूण शौरीच्या वेळी त्यांनी प्रयत्न केलाच होता.
ही अनुसूचित जाती जमातीचीच नाही तर आंबेडकरी विचारधारा मानणार्या प्रत्येकाच्या गुलामगिरीची सुरूवात आहे.
शत्रू बनून आलेला हा तितका धोकादायक नसतो जितका मित्र बनून पाठीत खंजीर खुपसणारा असतो.
कॉंग्रेस आघाडीच्या चाल आणि चरित्र्याला समजून घ्या. या विषारी सापाला ठेचाआ.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत