टोमॅटोचे दर कोसळले,शेतकरी राजा नेहमीच कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाने अडचणीत.

महाराष्ट्रासह देशभरात जून जुलै महिन्यात टोमॅटोचे दर वाढलेले होते. काही शेतकऱ्यांना एका किलोमागं १५० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. काही ठिकाणी टोमॅटोचं संरक्षण करण्यासाठी बॉडीगार्ड उभे केले गेले, सीसीटीव्ही लावले गेले. पण, महिनाभरातचं वेगळं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतातील टोमॅटो गाईंना चारा म्हणून खायला दिले आहेत. युवा शेतकऱ्यासमोर उभी राहिलेली ही वेळ निश्चितच दुर्दैवी आहे.
पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करुन सुध्दा पिकं करपली आहे.काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याने पिकविलेल्या टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने मोठ्या बातम्या झळकल्या.मात्र ,सध्या त्याच टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील तरूण शेतकरी सागर धांगट याने आपल्या शेतातून काढलेले टोमॅटो थेट गाईंना चारा म्हणून खावू घातले आहे.
काही दिवसापूर्वी टोमॅटोने दराचा उच्चांक गाठला होता मात्र आता उलट परीस्थीती झाली असून टोमॅटोला अगदी पन्नास पैसे किलो दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील सागर धांगट या होतकरू तरूण शेतक-याने आपल्या शेतातील टोमॅटोची गाईंना खायला दिले आहेत. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मेहनत तर वाया गेलीच पण बाजारात नेऊन दरच मिळत नसेल तर बाजारात नेऊन वाहतूक खर्च का वाढवून घ्यायचा या उद्देशातून या तरूण शेतकऱ्याने आपल्या गोठ्यातील गाईंना टोमॅटोची खाऊ घातल्यानं राहुरी तालुक्यासह राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची दुरावस्था समोर आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत