गुजरात मध्यप्रदेशात पावसाचा हाहाकार.

मागील दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने बहुतांश नद्यांना पूर आले आहे. यात प्रामुख्याने तापी व नर्मदा नदीला महापूर आला अणे. नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुजरातकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. बहुतांश रेल्वे नंदुरबार स्थानकावर खोळंबल्या आहेत.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांना फटका बसत आहे. गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेच्या भरूच रेल्वे स्थानकावर रेल्वे पटरीवर पाणी आलं असून गुजरात राज्यात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या या नंदुरबार रेल्वे स्थानकावर गाड्या मागील अनेक तासापासून उभ्या असून प्रवाशांच्या प्रचंड हाल होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत