जम्मू-काश्मीरमध्ये बस घसरून अपघात

जम्मू-काश्मीरमध्ये डोडा इथं डोंगर उतारावर बस घसरून कोसळल्यानं झालेल्या अपघातात ३६ जण ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर त्रांगल असरजवळ ही बस रस्त्यावरून ३०० फूट खाली कोसळली. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर डोडा आणि किश्तवाड इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत