दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

असाही एक एन्काऊंटर

सुरेश खोपडे

‘असाही एक एन्काऊंटर आणि तसाही एक एन्काऊंटर’
चार निष्णात शस्त्र धारी प्रशिक्षित पोलीस अधिकारी एका बाजूला. तर एक सफाई कामगार असलेला, लैंगिक दृष्ट्या विकृत,क्रूरकर्मा पण हातात बेडी घातल्याने हतबल बनलेला गुन्हेगार दुसऱ्या बाजूला. यांच्यातील चकमकची बातमी देशभर पसरली. वास्तव काय?
एकच गोळी डोक्यात मारून संपविला. बाकी स्टोरी सब झूट !
मग दोन पोस्टर झळकली. (देवाचा हात…., एकच नाथ……,)हेतू साफ दिसला !
खरा एन्काऊंटर आम्ही केलेला आहे.
14 फेब्रुवारी 1982. रायगड जिल्ह्यातील नेरे गावाजवळून दोन बैलगाड्यामधून हाजी मलंग यात्रे करुंचा वेश परिधान करून आम्ही निघालो. काही अंतरावर बैलगाड्या थांबवल्या. पायी निघालो. एका टीमचा प्रमुख मी.माझ्या सोबत एस आर पी चे चार शार्प शुटर्स.दुसऱ्या टीमचे प्रमुख इन्स्पेक्टर भंगाळे , रमेश घोसाळकर, कराटे प्लेअर अमिनुद्दिन, प्रशिक्षित पोलीस. काही अंतरावर कव्हरिंग साठी एस आर पी चे एक प्लाटून. तिकडून पहिल्यांदा गोळीबार सुरू झाला. आम्ही प्रतिकार केला.दुसऱ्या पार्टीचे रमेश घोसलकर जायबंदी झाले . आम्ही गोळीला गोळीने उत्तर दिले. एक गोळी मला पोटावर लागली.मी कुणाला सांगितले नाही. तेव्हड्यात इन्स्पेक्टर भंगाळे ओरडले “सर माझ्या पिस्तुलातून गोळ्या उडत नाहीत मी काय करू?”दुसरी गोळी मला मांडीवर लागली.आम्ही गोळीबार चालू ठेवला. पुढे सरसावून एकाला मी 15 फुटांवरून गोळी झाडली. तिसरी गोळी पींडरीत घुसली.आमच्या गोळीबारात दोन्ही दरोडेखोर ठार केल्यावर मी जखमी झाल्याचे इतरांना सांगितले.
ते होते बाळाराम व शिवराम उर्फ रामश्याम दरोडे खोर.22 वर्षे ठाणे व रायगड पोलिसांना अनेक मर्डर व दरोड्याच्या गुन्ह्यात हवे असलेले. आदिवासींना छळणारे गुन्हेगार.
सर्व घटना “राम श्याम शोध दरोडे खोरांचा या पुस्तकात चित्रित केलेली आहे .
निव्वळ बंदुकीने गुन्हेगारी संपते का?
1999 साली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असतानाची घटना. ज्वाला सिंग कांजार भट याच्या टोळीने महाराष्ट्र, आंध्रा, राजस्थान या राज्यात दरोडे व खून करीत धुमाकूळ घातला होता. सातारा मधील एका बंगल्यावर दरोडा टाकून त्याने खून, बलात्कार, लूट असा गुन्हा केल्याचा आरोप त्याच्यावर होता. महाराष्ट्र पोलीस हादरले. महाराष्ट्राचे सीआयडी क्राईम विभागाचे प्रमुख एन एम सिंग व महासंचालक अरविंद इनामदार यांनी महाराष्ट्रभर अधिकाऱ्यांच्या बैठका घेत ज्वाला सिंग विरुद्ध आघाडी उघडली. पण त्यांची कार्यपद्धती ही जुनाट होती. दिसेल तिथे त्याला गोळी घालण्याचे आदेश सुटले. पण तो दिसायला तर पाहिजे ना? सातारा पोलीस अधीक्षक मीरा बोरवणकर सोलापूर अधीक्षक, सीआयडी क्राईम प्रमुख एम एन सिंग यांचे पोलीस रात्रंदिवस छापे घालत राहिले. मी मात्र वेगळ्या पद्धतीने काम सुरू केले. महाराष्ट्रातील कंजर भट जमातीचा सर्वे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स तर्फे घेतला. सगळी जमात गुन्हेगार नव्हती. तीन ते चार टक्के लोक गुन्हेगारी करत. इतर लोक दारू गाळणे ,शेती, शेतमजुरी l व इतर कामे करून गुजरात असत. आम्ही बिगर गुन्हेगार लोकांच्या बैठका घेतल्या. त्यांना मोहल्ला कमिटीचे सभासद बनवले. आरोग्य , शिक्षण ,महिला शिबिरे सुरू केली. इतर योजनांची माहिती देणे सुरू केले. वयस्कर लोकांना स्थानिकाकडून मदत मिळवून दिली. तीन ते चार टक्के लोकांमुळे तुमचा सगळा समाज बदनाम होतो हे सांगितल्यावर ते गुन्हेगारांची माहिती द्यायला तयार झाले. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सगळ्या गावांमध्ये मोहल्ला कमिटी व गस्तीपथके निर्माण केली. ज्वाला सिंगच्या व इतर गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना भेटून मी त्यांना आश्वासन दिले. ते शरण आले तर आम्ही कोर्टातील केसेस संपल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करू. नाहीतर एन्काऊंटर केला जाईल. सगळ्या बाजूने कोंडी झाल्याने ज्वाला सिंग व गुन्हेगारांची बीतम बातमी पोलिसांना मिळू लागली. राजस्थान आंध्रा येथे जाऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी पाठलाग सुरू केला
आपण पकडले जाऊ किंवा आपला एन्काऊंटर होईल या भीतीने ज्वालासिंग ने मला निरोप पाठविला. बादशहा नावाचा त्यांचा एक सहकारी ज्याने आंध्रामध्ये पाठलाग करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याचा मर्डर केला होता व त्यांचेच हिसकवलेले पिस्तूल घेऊन तो मला शरण आला. एक एक करता अनेक गुन्हेगार शरण येऊ लागले. पुणे येथे घेतलेल्या बैठकीमध्ये मीरा बोरवणकर यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली की पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी 40 गुन्हेगारांना आसरा दिलेला आहे. मी सांगितले 40 नाही तर 65 गुन्हेगार माझ्या संपर्कात आहेत. त्यावर इनामदार भडकले. तुम्ही स्वतःला काय विनोबा भावे की आचार्य कृपलानी समजतात काय? तुमचे ते नाटक भिवंडीला चालले. बंद करा ते थेर.यापुढे दरोडा पडला तर मी तुम्हाला जबाबदार धरील! वगैरे वगैरे.
ज्वाला सिंगने निरोप पाठवला.’ माझा एन्काऊंटर करणार नसतील तर मला पोलीस अधीक्षकांना भेटायचे आहे.’ आळंदी जवळील डोंगरावर तो मला आणि एलसीबी इन्स्पेक्टर शिंदे यांना भेटला.
‘मी शरण येतो पण माझे सगळे गुन्हे माफ करा. ‘
मी त्याला सांगितले की ‘ कायद्यापुढे सगळे समान असतात. कोर्टातून शिक्षा पूर्ण झाल्यावर तुझे पुनर्वसन करण्यात येईल. मी तुला शब्द दिलाय म्हणून तुला सोडतो.तू विचार कर.’ त्याला जाऊ देण्यात आले. ही बातमी पोलीस दलात महाराष्ट्रभर पसरली. सगळीकडून आश्चर्य आणि राग व्यक्त करण्यात आला. मी त्याला शब्द दिला होता की एन्काऊंटर करणार नाही मी माझा शब्द पाळला. ज्वालासिंगने ही त्याचा शब्द पाळला. पुढच्या दोन दिवसातच आपल्या 67 साथीदारासह ज्वाला सिंग पुणे ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. त्या कार्यक्रमाला कोल्हापूर रेंजचे महानिरीक्षक बाली हे देखील हजर होते.( ज्वाला सिंग गुन्हेगारांची शरणागती हा लेख स्वतंत्र देत आहे )
राम शाम या एन्काऊंटर मध्ये 14 वर्ष शौर्य पदकासाठी मला संघर्ष करावा लागला. या घटनेवर आधारित राम शाम दरोडेखोरांचा हे पुस्तक प्रकाशित केल्यावर त्यातील वास्तव वाचून वसंत साफ सराफ, येस येस जोग,डी एस सोमन यांनी माझा वार्षिक गोपनीय अहवाल चुकीचा प्रतिकूल लिहून माझे प्रमोशन नाकारले. (सुदैवाने सराफ अजून हयात आहेत.ते बोलू शकतात.)आणि शौर्य पदकासाठी असलेला विशेष भत्ता 2011 पासून शासनाने मला दिला नाही. एप्रिल 19 83 साली ‘ सुरेश खोपडे यांना दीडशे रुपये व जखमी हवलदार घोसाळकर यांना 75 रुपये शासनाकडून मदत द्यावी’ अशी शिफारस तत्कालीन पोलीस अधीक्षक पि डी जाधव यांनी केली होती. ती रक्कम अजून मला मिळावयाची आहे!
अगोदर मान्य करून ही मला महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यासमोर ज्वाला सिंग शरणागतीची केस अरविंद इनामदार यांनी सादर करू दिली नाही. मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये ज्वाला सिंग शरणागतीची माहिती सांगण्यात आली पण ज्वाला सिंगला पकडण्याचे काम पोलीस अधीक्षक सोलापूर यांनी केले असे एम एन सिंग यांनी सांगितले (सुदैवाने अजूनही हयात आहेत त्यांनी यावर खुलासा करावा पण ते करणार नाहीत)
आम्ही केलेला व फडणवीस यांनी केलेला एन्काऊंटर यात फरक काय?
लैंगिक दृष्ट्या विकृत, नराधम व पेशाने सफाई कामगार असलेल्या गुन्हेगाराला सरकारच्या चार प्रशिक्षित प्रतिनिधींनी ठार मारल्या बरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एका हातात पिस्तोल झाडताना व एके फोर्टी सेवन बंदूक झाडताना चा फोटो अनेक ठिकाणी लागला.आणि टायटल होते बदला पुरा.
खरे तर देवेंद्रने पुरा बदला घेतला तो आपल्या आपटे कोतवाल या आरएसएस मधील जातभाईंना भाईंना वाचविण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण महाराष्ट्र पोलीस दल नासवले अगर बिघडवले नाही हे दाखवत मतपेटीवर लक्ष ठेवण्यासाठी. पण सामान्य माणसाला माहित नाही की आत्ताचे पोलीस जसे चांगले आहेत तसेच त्यामध्ये मला भेटलेल्या वसंत सराफ, यस यस जोग, डी एस सोमन अरविंद इनामदार, एम एन सिंग, के के कश्यप,…अशा पोलीस अधिकाऱ्यांची परंपरा चालवणारे अधिकारी आहेत .देवेंद्रच्या जात भाई विरुद्ध एखाद्या महिलेने तक्रार दिली तर हेच पिस्तूल व हीच एके फोर्टी सेवन त्या महिलेला दाखवून तिचे तोंड बंद केले जाईल.व तिची फिर्याद घेतली जाणार नाही. अगर तसी मागणी करणाऱ्या तिच्या नातेवाईकावर रोखली जाईल.
देवेंद्र व एकनाथ यांचे हातात कितीही भयानक शस्त्र असली तरी सामान्य जनतेच्या हातामध्ये राज्यघटनेने एक विध्वंसक हत्यार दिलेले आहे. लोकशाही पद्धतीत मतपेटी द्वारे अशा राजकारण्यांचा व राजकीय विचारसरणीचा आपल्याला नक्कीच एन्काऊंटर करता येईल!
सुरेश खोपडे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!