महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

उत्तर प्रदेशातील आंबेडकरी विचारांच्या पक्षाकडून आंबेडकरी विचारांचा पराभव ?

शरद आढाव,

दलित पँथर स्थापना-२९ मे १९७२

‘ब्लॅक पॅंथर’च्या धर्तीवर गोऱ्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या चळवळीसारखी महाराष्ट्रात स्वसंरक्षणासाठी आणि ब्राह्मणवादाला शह देण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तिचे नाव- ‘दलित पॅंथर.’ योगायोगाची गोष्ट म्हणजे पूर्वीसुद्धा शूद्रांचा काही अंशी ‘दलित’ असाच उल्लेख केला जात होता. पण यावेळी ‘दलित’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरला गेला.

उत्तर प्रदेशातील आंबेडकरी विचारांच्या
नावाने स्थापन झालेले पक्ष…

१.BAMCEF…स्थापना- ६ डिसेंबर १९७८
Backward And Minority Communities Employees Federation.

२.DS4…स्थापना- ६ डिसेंबर १९८१
Dalit Shoshit Samaj Sangharsh Samiti.
(ब्राह्मण,ठाकूर, बनिया चोर
बाकी सब डी एस फोर.)
(तिलक तराजू और तलवार
इनको मारो जुतू चार.)

३.BSP…स्थापना-१४ एप्रिल १९८४
Bahujan Samaj Party.

(२००७ सालची घोषणा
हाथी नही ये गणेश है।
ब्रह्मा विष्णू महेश है।)

१९७२ पासून कार्यरत असलेली दलित पँथर नावाची तरूणांची आक्रमक संघटना कशी संपली, हे बामसेफ,डीएसफोर, व बसप ह्या तीन संघटनांच्या नामांतरावरून लक्षात येईल.

देशातील राजकीय आरक्षणाचा कालावधी १९८० साली संपणार होता.बामसेफवाल्यांनी अतिशय कल्पकबुध्दीने व पध्दशीरपणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचा असा बुध्दीभेद केला की,शासकीय सेवेतील आरक्षण १९८० साली संपणार आहे.जर आपले आरक्षण सुरक्षित ठेवायचे असेल, आरक्षणास मुदतवाढ हवी असेल तर बामसेफचे सभासद व्हा व आपले आरक्षण संरक्षित करा.ह्या संघटनेच्या माध्यमातून बामसेफने कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली व प्रचंड निधी संकलीत केला.

वास्तविक,सरकारी सेवेतील आधिकारी व कर्मचारी यांच्या आरक्षणाला घटनेनुसार कालमर्यादा नाही. राज्यघटनेत पंचेचाळीसावी सुधारणा करून राजकीय आरक्षणाला १४ एप्रिल १९८० साली दहा वर्षांची मुदतवाढ तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी दिलेली आहे.

महाराष्ट्रातील जो अभ्यासू व शासकीय अधिकारी व कर्मचारी असलेला तरूण वर्ग दलित पँथरकडे तन,मन व धनाने आकृष्ट झालेला होता. हा तोच वर्ग दलित जो पँथरपासून दुरावला व बामसेफचा केवळ सभासदच झाला नाही तर कट्टर समर्थक झाला.तन मन व धनाचे योगदान स्वतःच्या उज्जवल भवितव्यासाठी देऊ लागला, ह्याचाच दुष्परीणाम (साईड इफेक्ट) दलित पँथरवर झाला.

ह्यानंतर बामसेफ,डीएस ४ ते बसप असा प्रवास केलेल्या राजकीय पक्षाकडून आपणास राजकीय सत्ता मिळेल अशी दिवास्वप्ने पढालिखा आंबेडकरवादी समाज पाहू लागला व अजूनही पाहतोय व जोपर्यंत पृथ्वीर चंद्र, व सूर्य आहे तोपर्यंत पाहतच राहणार!

ह्या सर्व घडामोडीत दलित पँथर नावाची बलाढ्य व आक्रमक असलेली संघटना दलित की, आंबेडकरवादी, बुध्द की मार्क्स ह्या वादात संपून गेली.एकिकडे बौध्दधम्मिय आंबेडकरवादी असलेला समाज सध्या दलित, मूलनिवासी, बहुजन व नव्याने स्वतःला अभिमानाने वंचित समजू लागलेला समाज गटा तटात विभाजीत झालेला आहे.दुसरीकडे सुशिक्षित, नवश्रीमंत व सुस्थापित झालेला पराड़मुख बौध्द समाज गोयंका गुरूजींनी शोध लावलेल्या विपश्यनेत गुरफटलेला आहे.

काँग्रेस, महात्मा गांधी व पंडित नेहरूंच्या द्वेषावर आधारीत प.पू.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या नावाने स्थापन झालेले ब.स.पा. सारखे राजकीय पक्षच आंबेडकरी विचारसरणी नष्ट करीत अप्रत्यक्षपणे हेडगेवार व गोळवळकर ह्यांच्या आंबेडकरी विरोधी विचारांना कसे कळत नकळत खतपाणी घालत गेले, हे ह्या पक्षांच्या नेतृत्वाच्या लक्षात आले नाही व ह्या पक्षांच्या समर्थकांनाही कळले नाही.

काशीरामांच्या बहुजन समाज पक्षाने मनुवादी विचारसरणीविरूध्द व्यापक लढा पुकारला होता, काशीरामांनी समाजवादी पक्षासोबत युती करून १९९३ साली निवडणुका लढविल्या होत्या समाजवादी पक्षाने २५६ व बहुजन समाज पक्षाने १६४ जागा लढविल्या. समाजवादी पक्षाचे १०९ व बहुजन समाजवादी पक्षाचे ६७ आमदार निवडून आले होते. मुलायम सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले त्या समाजवादी पक्षाचा पाठिंबा काढून… विरोधी विचारांच्या पक्षाचा……. भाजपचाच पाठिंबा घेऊन (भाजपचे १७७ आमदार निवडून आले होते) राम मनोहर लोहियांनी जनसंघाच्या नानाजी देशमुखासोबत युती करून १९६७ साली गैरकाँग्रेसचे सरकार उत्तर प्रदेशात आणले होते त्याची पुनरावृत्ती काशीरामांनी सन १९९५ साली मायावतींना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनवून ऐतिहासिक राजकीय चूक केली.
पुढे मायावती
१] ३ जून १९९५ ते १८ ऑक्टोबर १९९५
२] २१ मार्च, १९९७ ते २१ सप्टेबर,१९९७,
३] ३ मे,२००२,ते २९ ऑगस्ट,२००३ व
४] ***१३ मे, २००७ ते १५ मार्च, २०१२
ह्या कालावधीत मुख्यमंत्री झाल्या.

***२००७ साली मायावतीने
हाथी नही ये गणेश है।
ब्रह्मा विष्णू महेश है।
ही घोषणा दिलेली होती त्यावर्षी बसप.पूर्ण बहुमत मिळवून २०६ मतदारसंघात विजयी झाले होते.

सध्या ४०३ आमदार असलेल्या उत्तरप्रदेशाच्या विधानसभेतील बसप फक्त एक आमदार आहे.परंतु,बसपच्या बॅनरवर तीन डझन थोर व्यक्तींचे फोटो आहेत व ते वाढतच आहेत.
(अगदी ताजी बातमी महाराष्ट्रात भाजपचे १०५ आमदार असताना निम्म्याहून कमी आमदार संख्या असलेल्या शिवसेनेच्या गटाला मुख्यमंत्रीपद दिले आहे.)

भाजपने जातीनिहाय राजकीय अंकगणिताचा बारकाईने अभ्यास केला, सर्व अब्राह्मण जातींना धर्माच्या व रामाच्या नावावर अतिशय चाणाक्षपणे हिंदुत्वाच्या माळेत गुंफून घेतले. धर्मनिरपेक्षवादी काँग्रेस पक्ष व तथाकथित आंबेडकरवादी बसपा ह्या दोन्ही पक्षांचा हिंदुत्ववादी भाजप विचारसरणीने पराभूत केला.आता तर तथाकथित आंबेडकरवादी संंघटना व बहुजन समाज पार्टी भाजपला पूरक व काँग्रेसला मारक राजकारण करीत आहे.

महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकीय संघटनांनी काशीरामांनी शोधून काढलेल्या अठरा पगड जातींच्या बहुजन नायकांच्या पूजाअर्चा सुरू केलेल्या आहेत.ह्या अठरा पगड जातींच्या बहुजन नायकांच्या समाजाची मते आपल्या संघटनांना मिळतील असा गोड गैरसमज आंबेडकरी संघटनांचा व महाराष्ट्रातील धर्मांतरीत हिंदू महारांचा गैरसमज झालेला आहे.प्रत्येक निवडणुकीत पूर्वाश्रमींच्या हिदू महारांशिवाय आंबेडकरी संघटनांना कोणीही मते देत नाही.हे कटू सत्य ह्या संघटनांचे व समर्थक स्वीकारायला तयार नाहीत.एकाही आंबेडकरी संघटनेला राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता नाही. ह्यांच्या शासनकर्ती जमात बनण्याच्या वेडपटपणामुळे ह्यांनी बौध्द धम्माचेच विकृत हिंदुत्वकरण आणि तथागत भगवान गौतम बुध्द व बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची हिंदू थोर व्यक्तींच्या संचात स्थापना करुन बुध्द व बाबासाहेब यांचे अवमूल्यन सुरू केलेले आहे.

येणारा काळ आपल्यासाठी अतिशय अवघड आहे. आपण आपला संपूर्ण फोकस शिक्षण, आरोग्य आणि धनसंचय ह्यावर केला पाहिजे. कारण,मनुवादी शक्तींची युती होत असताना आपल्या मतांमुळे आपला एकही उमेदवार (बौध्द) निवडून येत नाही,उलट धर्मनिरपेक्ष व संविधानवादी शक्तीच्या मतांची विभागणी हेऊन मनुवादी शक्तींच राजकीयदृष्ट्या बळकत होत आहेत, हे मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनेक निकालावरून सिध्द झालेले आहे. आंबेडकरी मतदारांनीच चिंतन मनन करून मागील तीन निवडणुकांच्या निकालाच्या अनुभवातून शहाणे होण्याची आता वेळ आलेली आहे.

जय भीम!


शरद आढाव,
मुबई

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!