कोणतीही एक जात ब्राम्हणशाहीला पराभूत करु शकत नाही!
विनायकराव जामगडे
ब्राम्हणवादी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून सतत जागृत असतात.ही व्यवस्था कशी मजबूत होईल ह्यासाठी नवं नवीन प्रयोग अंमलात आणून ह्याव्यवस्थेविरुद्ध. कोणी आवाज उठविणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते.त्यासाठी प्रचार माध्यमे सतत राबत असतात.समाजात वैचारिक गोंधळ कायम ठेऊन डोळ्यांवर झापडे चढविले जातात.कोणत्याही नविन विचाराची गर्भातच हत्या केली जाते.विचार उफाळून वर येत असेल तर त्याला देव व धर्माच्या नावानी बुडविल्या जातात.जातीच्या उतरडीमुळेही शक्य होते.जाती जातीत भांडणे लावून एकमेकांपासून विभक्त कसे होतील ह्यासाठी डावपेच आखले जातात.जातीच्या अहंकारामुळे ते एकत्र येत नाही.हे एकत्र न येणे ब्राम्हणी गुलामीला हितकारक आहे.त्याची मानसिकता गुलामीची केल्यामुळे ते वर्तुळा.बाहेर जाण्यास धजत नाही.गुलामी घट्ट करण्यास मदत करीत असतात.आरंभीच्या काळात संत चळवळीने समाज प्रबोधनाचे कार्य करुन समाजात जागृती केली. त्या संतांचा छळ करण्यात आला.त्याचा खून करुन त्यांना संदेह वैकुंठाला पाठविल्याची बतावणी करून त्यांच्या नावाने ब्राम्हणी व्यवस्थेचे गुणगाण करणारे अभंग स्वतःरचून त्यांच्या नावाने प्रसिद्ध केली व संत चळवळ देववादाच्या भोवर्यात अडकविली.देव धर्म अंधश्रद्धा सतत वाढत आहे.
महात्मा जोतीराव फुले यांनी ब्राह्मणवादास आव्हान उभे केले.पर्यायी व्यवस्था दिली.आपल्या चळवळीचा आरंभ स्त्रियां व अतिशुद्रात जनजागृती करून मानवतेची. जाणिव करून दिली.त्यानी शिक्षणाची सुरुवात स्त्रियां व अतिशुद्रा पासून केली.ते वेदाला भेद म्हणत व त्यापासून दूर राहण्याचा सावधगिरीचाउपदेश देत.बंधुभाव निर्माण करण्याचा हयातभर प्रयत्न केला.जातीमधील दरी कमी करून ते मुळचे एक आहेत याची जाणीव करून दिली.अनेक संकटांना तोंड देत चळवळ मजबूत करून ब्राम्हणी व्यवस्थेला हादरा दिला.शुद्र अतिशुद्र यांच्यात समेट घडवून आणला.जे उपेक्षित होते.त्याना आपलेसे केले त्यांच्यात आत्मतेज निर्माण केले.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर ह्या चळवळीला गती देण्याचे काम छत्रपती शाहु महाराजांनी केले.आपल्या राज्यात प्रशासनात ५०टकके आरक्षणाची तरतुद करुन ब्राम्हणशाहीला शह दिला.बहुजनाला प्रशासनात संधी दिली.अस्पृश्य लोकांना उद्योगधंदे काढुन दिले.व त्यात स्वतः लक्ष्य घातले. पुरोहितशाहीला विरोध केला. त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचार राबविण्यात कोणतीही कुचराई केली नाही.नेहमी प्रोत्साहन देऊन चळवळ गतीशील केली.शिक्षण शिष्यवृत्ती देऊन शिक्षण घेण्यात प्रोत्साहित केले.ब्राम्हणेतर समाजात जागृती करून एकता कायम केली. अस्पृश्य लोकांना संघटित होण्यास मदत करून त्याचा उत्साह द्विगुणित केला.व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुढे करून त्याचे नेतृत्व स्विकारायचे आवाहनकेले. हा दिलदारपणा छत्रपती शाहू महाराजदाखवू शकले.असा दिलदारपणा नंतर कोणत्याही नेत्यांने दाखविला नाही..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी माणुसकी साठी लढाईला सुरुवात करतेवेळी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन केली.जाती उच्छादाच्या लढाईत जो सामील होईल त्याचे स्वागत केले.महाडच्या चवदार तळयाचा पाण्याच्या सत्याग्रह साठी सर्व लोकांना सोबत घेऊन सत्याग्रह यशस्वी केला.प्रत्येक लढाईत सर्वांना सामावून घेण्याचा दृषटिकोन बाबासाहेबाचा होता.परतु ब्राम्हणी चालीला बळी पडुन सत्तेच्या लालसेने जातीचा आधार घेऊन बाबासाहेबापासूनफुटले. ब्राम्हणवादासी टक्कर कोणतीही एक जात एकटी देऊ शकत नाही.परतु बाबासाहेबांना आपली चळवळ एकट्यालाच चालवावी लागली.व त्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेला आव्हान उभे करून समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय या तत्वप्रणालीवर आधारित समाज व्यवस्था पुरस्कारली.
कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार चळवळीसोबत मिल कामगार संपाच्या वेळी सहभाग करुन संप यशस्वी केला.परतु कम्युनिस्टानी बाबासाहेबांना सहकार्य नाकारले अस्पृश्य समाजाच्या कामगारांना मिलमध्ये धोटयावर काम करण्यास सहकार्य केले नाही.कारण जातीचे वर्चस्व आडवे आले.कामगारात फुट पडेल म्हणून त्यांना धोटयाच्या कामांवर अस्पृश्यांस घेण्यास विरोध केला . वर्ग संघर्ष करणार्यांला वर्ण संघर्ष नाडला.शुद्र अतिशुद्र समाज एकत्र यावा यासाठी बाबासाहेब हयातभर लढत राहिले. त्यांनी बहुजन वर्गाला आरक्षण दिले जावे ह्या करिता कमीशन नेमण्यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम३४०,नुसार तरतुद केली.व त्यांचा पाठपुरावा केला म्हणून पंडित नेहरू पंतप्रधान असताना कालेलकर आयोगाची निर्मिती केली.परतु कालेकरानी आरक्षण विरोधी टिप्पणी जोडुन हा अहवाल थंडया बस्त्यात टाकला.बहुजनसमाजाला भटक्या समाजाच्या कल्याणासाठी आवाज बुलंद केला व घटनेत तरतूद केली.बाबासाहेबाची चळवळ व्यापक होती.परतु तिला जातीचा शिक्का मारून दुसर्या जातीस त्यांच्या पासून वेगळे राहण्यास बाध्यकेले.अनेक प्रकारचे आरोप करून बहुजन समाजाला दूर ठेवण्यात ब्राम्हणी व्यवस्था यशस्वी ठरली.
आजही जातीय अहंकार काम करतो आहे.आपण उच्च जातीचे असल्यामुळे हीन जातीच्या लोकांचे नेतृत्व कसे स्विकारायचे म्हणून ते दूर राहतात.काही लोक संघटनेत प्रवेश करून संघटनेचे नेतृत्व करण्याची आकांक्षा ठेऊन कार्य करतात.त्याना नेतृत्व मिळाले नाही तर त्यापासून फटकून वागतात.सघटनेत काम करेपर्यंत जयभिम उच्चारायचे व नंतर जयभिमचा तिरस्कार करायचा.त्याऐवजी नमस्कार जय ज्योती असे अभिवादन करायचे.जयभिम म्हणण्यास सुद्धा जातीय अहंकार आडवा येतो.आबेडकरी माणूस आपसात भेटला तर जयभिम असे म्हणतो परंतु बहुजन माणूस ब्राम्हणी व्यवस्थेचा विरोधक असला तरी तो नमस्कारच म्हणतो.ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरू मानले त्याची चळवळ विकसित केली.त्या आंबेडकरांचे नाव घेण्याचे बहुजन कार्यकर्त्यांना संकोच वाटावा हे नवलच आहे.यातचब्राम्हणी व्यवस्था ही यशस्वी होत असते.जातीय वर्चस्व जोपासणे हा त्यांचा प्रथम हेतु असतो.हयाला बहुजन बळी पडत असतो. सत्तेच्या सहभागासाठी आंबेडकर चालतो.परतु सांस्कृतिक ओळखी करिता जयभिम नको.ही बहुजन समाजाची मानसिकता आहे.हाब्राम्हणी व्यवस्थेचा डावपेचांचा भाग आहे.एकरूप होऊ द्यायचे नाही.करिता बहुजन समाजाला गुंगित ठेवले जाते.आपल्यापेक्षा वरच्या जातीच्या पाया पडायचे परंतु आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या लोकांना लाथा मारायच्या अशी मानसिकता बहुजन समाजाची झालेली आहे.गुलामीची झूल उतरावयाची नाही तर त्यातच समाधान मानायचे.
विनायकराव जामगडे
मो.९३७२४५६३८९ , ७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत