आर्थिककायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

आरक्षणा मागचे राजकीय तिढे,,,,,,,धनगर आरक्षण ,, मराठा आरक्षण ,,,,,!

ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर 
मो न :- 9960178213

आपण सर्व जण आरक्षण लढाई शी परिचित आहात , त्या मुळे यावर जादा चर्चा न करता आपण सरळ मुख्य मुदया कडे येऊ ,,,,,
धनगर समाजाला ओबीसी प्रवर्गातील एन टी मधून 3•50%आरक्षण आज महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धोरणा मुळे अस्तित्वात आहे .
धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात ( आदिवासी) धनगर समाजाचा समावेश करावा अशी मागणी आहे .
तर आ गोपीचंद पडळकर यांच्या मता नुसार धनगर हे आदिवासीच आहेत , व त्यांचा नव्याने समावेश करण्यासाठी फक्त शासकीय जी आर काढून “ड” व “र” ही स्पेलिंग मिस्टेक आहे असे घोषित करून धनगर म्हणजेच धनगड आहेत असे जाहीर करावे व आरक्षण सुरू करावे .
पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षण उपोषण कर्त्याना भेटण्यास आलेल्या माजी मंत्री अण्णा साहेब डांगे यांनी मांडलेली भूमिका ही स्वतंत्र आहे त्यांचे म्हणण्यानुसार
“धनगर समाजाला आदिवासी प्रमाणे
आरक्षण द्यावे ,,,,!
ऍड बाळासाहेब जी आंबेडकर यांनी फोन द्वारे जो वार्तालाप उपोषण कर्त्यांशी केला त्या नुसार धनगर आरक्षणाचे ताट ही स्वतंत्र असावे ,,,,,,
धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण का हवे आहे? याचे उत्तर आ . गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे , त्या नुसार सद्य स्थितीत राजकीय आरक्षण हे फक्त एस सी , एस टी प्रवर्गा साठी त्यांचे लोकसंख्या प्रमाणात आहे , त्या मुळे स्थानिक स्वराज्य संस्था , विधानसभा , लोकसभा या साठी त्यांचा कोटा राखीव होतो ,,
त्या मुळे आज जे आदिवासी आहेत त्यांनी घाबरून जावे असे कांहीं नाही तर त्या कोट्यात धनगर समाजाचा समावेश झाला तर लोकसंख्या वाढी मुळे एकूण कोट्यात वाढ होईल .
( जिथे आदिवासी पट्टा आहे तिथे त्यांना तर ज्या भागात धनगर समाज संख्या अधिक आहे तिथे धनगर समाजाला लोकप्रतिनिधित्व राखीव होईल )
आपणास हे ही ज्ञात आहे की ओबीसी साठी असे स्थानिक स्वराज्य संस्था वगळता स्वतंत्र राजकीय आरक्षित कोटा अस्तित्वात नाही ,
तसेच एस सी, एस टी आरक्षण कोटा पूर्ण भरल्या नंतरच 50%ची मर्यादा न ओलांडता ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेत देण्याची तरतूद आहे .
अलीकडे हे ही आरक्षण ट्रिपल टेस्ट ( इंपिरिकल डाटा ) असल्याशिवाय देता येणार नाही अश्या कोर्ट निर्णयाने अडकलेले आहे•
धनगर समाजाला असे आरक्षण मिळाले तर त्यांचा राजकीय कोटा थेट 7 %वर जाईल व तो अधिकृत लोकसंख्या प्रमाणात असेल .
असे झाले तर त्याचा सर्वाधिक फटका कोणास बसेल?
महाराष्ट्रातील 288 विधान सभे तील एस सी चे 29 व एस टी चे 25 सदस्य अस्तित्वात आहेत.
याचा सरळ अर्थ 54जागा ह्या राखीव आहेत तर उर्वरित 134जागा ओपन आहेत .
या ओपन जागेवर मोजके अपवाद वगळले तर बहुतांश ठिकाणी “मराठा”
प्राबल्य असलेल्या राजकीय नेत्यांच्या हातात ही सत्ता एकवटलेली आहे .
आणि ओपन जागेवर मराठा समाजाशी राजकीय स्पर्धा करण्याची क्षमता धनगर समाजाची कमी पडते , म्हणूनच त्यांना आरक्षणाचे संरक्षित कुंपण हवे आहे .
दुसऱ्या बाजूने मराठा समाजाला ही ओबीसी आरक्षण हवे आहे , इथे ही
ओबीसी प्रवर्गात सरसकट मराठा समाजाचा समावेश झाला तर 27% आरक्षणात बहुसंख्य मराठा सामील होईल आणि त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात होईल अशी भीती ओबीसी समूहाला वाटते याचे कारण राजकीय , आर्थिक , सामाजिक क्षेत्रात प्रबळ असा मराठा समाजच आहे आणि आज मुश्किलीने स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत ते पंचायत समिती , जिल्हा परिषदेत ओबीसी चां जो टक्का आहे तो ही खाली घसरेल आणि सर्वंकष सत्ता फक्त या जाती समूहाच्या हातात एकवटेल अशी भीती गैर मराठा समाजात पसरलेली आहे ,
इथे ही आरक्षण 50% चे आत ठेवण्याची अट अस्तित्वात आल्याने टिकावू आरक्षण हवे असेल तर ते फक्त प्रवर्गातून च असेल तरच ते शाश्वत व टिकाऊ होते •
धनगर समाजाला ओबीसी मधील एन टी चे आरक्षण नको आहे , पण ते एस टी आरक्षण मिळाले तर ,,, त्या पूर्वी ते आहे त्या आरक्षणातून बाहेर पडण्याचा धोका स्वीकारू शकत नाहीत .
तसे करणे म्हणजे “हातचे सोडून पळत्याच्या मागे” ते धावण्या सारखे होईल,,,,,
त्या मुळे ओबीसी समूहातील इतर जाती समुहा पेक्षा ही तीव्र विरोध हा लक्ष्मण हाके , व आमदार गोपीचंद पडळकर यांचा आहे .
ओबीसी समाजातील मराठा समावेशाला धनगर , वंजारी , माळी अश्या समूहाचा विरोध आहे ,
तर धनगर समाजाच्या एस टी
प्रवर्गातील समावेशाला थेट आदिवासी समाजातून तर अप्रत्यक्ष रित्या शासक असलेल्या मराठा वर्गा द्वारे विरोध आहे . हे आपण समजून घेतले पाहिजे .
या दोन्ही आरक्षण लढाई पासून एस सी समाज कोसो दूर आहे , त्याचे कुणाला ही समर्थन किंवा विरोध असण्याचे कारण नाही ,
हीच बाब ब्राम्हण समाजाची असली तरी ते सामाजिक दर्जाने सर्वात वरिष्ठ आहेत , आणि शासन कर्ता बनायचे असेल तर ओबीसी समाजाला आपल्या सत्तेचा वाहक बनवावे लागेल हे ते जाणतात म्हणून त्यांचा वैचारिक , मानसिक कल हा शासनकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला वगळून गैर मराठा जातींना आपल्या बाजूकडे वळवण्याचा आहे ,
तरीही मराठा शासक वर्गातील कांहीं गटांना थेट ते आपल्या कडे वळवतात व त्यांच्या हातात सत्तेची सूत्रे ही देतात याचे कारण त्या सत्तेला ते विभाजित करू पाहतात एवढाच याचा अर्थ आहे ,
राजकीय , आर्थिक , सहकारी चळवळ याने मजबूत असलेला शासक मराठा वर्ग अधून मधून उसळी घेत असला तरी या वर्गाला कमजोर करण्याची दीर्घ कालीन लढाई ते लढत आहेत ,
महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणा व कारवाया थंड बस्त्यात ठेवलेल्या असल्या तरी ही निवडणुकीनंतर आलेल्या निकालामुळे त्यांचे शत्रू आणि मित्र उघड होतील , त्या नंतर तातडीने निवडणुका नसल्याने ते अधिक कठोर होतील , व तसे सूचक वक्तव्य केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शहा यांनी केले आहे ,
नुकतेच पवार साहेबांनी आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे त्याच प्रमाणे मुस्लिम, लिंगायत , धनगर आरक्षणाला ही पाठिंबा आहे असे वक्तव्य केले आहे ,
मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी यांनी त्यांच्या “मंडल नामा” या आत्मचरित्रात स्पष्ट केले आहे की कोणतेही आरक्षण हे वर्गाला असते ते जातीला नसते , आणि कोणतेही आरक्षण धर्मा आधारे देता येत नाही ,,
ते व्यवसायाच्या आधारे द्यावे लागते , या अर्थाने मुस्लिम धर्मातील कुरेशी , बागवान , पिंजारी , भिश्ती , इराणी , रीच वाले, मेहतर , आदी 69जाती ना ते मिळत आहे , तसेच लिंगायत मधील तेली , बेडा जंगम यांना ही मिळत आहे ,
धनगर समाजातील खाटीक धनगर यांना एस सी चे तर मराठा कुणबी , लेवा पाटील यांना ओबीसी मिळत आहे ,
सरसकट सर्वाना देण्यासाठी त्याची व्याप्ती व कायदे आणि तरतुदी ही बदलाव्या लागतील फार मोठे घटनात्मक बदल घडवून आणावे लागते , आरक्षणाची परिभाषा बदलावी लागेल हे बदल घडवण्याची ईच्छा केंद्रीय शासकांची आहे का?
हा खरा कळीचा मुद्दा आहे ,
पण आरक्षणाचे राजकारण चालत राहणार ,,,, राजकीय नेते समाजाला भावनिक बनवून त्यांचे राजकारण करत राहणार , युवक भावनिक होऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न करणार , त्यात कांहीं जणाचे प्राण ही जाणार ,, सामाजिक ताण तणाव वाढत राहणार ,,,, राजकारण म्हणले की डाव प्रतिडाव आलेच ,,,
यालाच आपण राजकीय तिढे म्हणतो
देवेंद्र जी फडणवीस यांनी टाकलेल्या डावाला बामणी कावा ,,,,
तर शरदचंद्र जी पवार साहेब यांनी टाकलेल्या डावाला कुशाग्र बुध्दी
म्हणणार ,
भाजपच्या दृष्टीने देवेंद्र जी हे कुशाग्र असतात नायक असतात ,
तर राष्ट्रवादी समर्थक त्यांना खलनायक ठरवणार व महाराष्ट्राची अस्मिता , आणि योध्दा म्हणून पवार साहेबाना घोषित करणार ,,,,
हेच आहेत आर्क्षणा मागचे राजकीय तिढे,,,,,,,!

26/9/2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!