दि. २७ सप्टेंबर १९५१ रोजी स्वाभिमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा.
आज दि. २७ सप्टेंबर
दि. २७ सप्टेंबर १९५१ रोजी स्वाभिमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा.
भारतीय संसदेने हिंदू कोड बिल मंजूर न केल्याने दु:खी होऊन बाबासाहेबांनी दि. २७ सप्टेंबर १९५१ रोजी केंद्रीय मंत्रीपद सोडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार म्हणून ओळखले जाते. तथापि, त्यांनी त्याचवेळी ओबीसी (इतर मागास वर्ग) या समाजासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकडे देशाचे हवे तेवढे लक्ष गेलेले नाही. भारताचे कायदामंत्री म्हणून १९४७ ते १९५१ या काळात त्यांनी प्रामुख्याने राज्यघटना आणि ‘हिंदू कोड बिल’ (महिला हक्क कायदा) तयार करण्यासाठी अपार परिश्रम घेतले. भारतीय संसदेने हिंदू कोड बिल मंजूर न केल्याने दु:खी होऊन त्यांनी केंद्रीय मंत्रीपद त्यागले. या राजीनाम्यामागे आणखी दुसरे कारण या देशातील कुणबी, माळी, तेली, तांबोळी, साळी, धनगर, बंजारी, कोळी, बंजारा, आग्री, भंडारी, न्हावी, शिंपी, सोनार, सुतार, कुंभार यांच्यावरील अन्यायाकडे लक्ष वेधणे हे होते. हे फारसे चर्चेत आले नाही.
नेहरु सरकारने ‘हिंदू कोड बिल’ (महिला हक्क कायदा) पास केले नाही म्हणून या विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाला लाथ मारली. त्यांनी हा राजीनामा २७ सप्टेंबर १९५१ रोजी दिला होता. तो १० ऑक्टोबर १९५१ रोजी मंजूर झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत