संविधान मंदिर आणि बाबासाहेबांचा इशारा
समाज माध्यमातून साभार
संविधान मंदिरांचे उद्घाटन करणाऱ्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संविधान सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील काही संदर्भ दिले. देशाला उद्देशून अनेक महत्वपूर्ण इशारे देणारे हे बाबासाहेबांचे भाषण आज ७५ वर्षांनंतरही दिशादर्शक आहे. धनखडांनी त्यातील संदर्भ देताना याच भाषणातील बाबासाहेबांनी दिलेला खालील इशारा वाचला नाही का?
‘इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’
त्यांनी हा इशारा वाचला असता आणि ते प्रामाणिक असते तर संविधान मंदिरांचे उद्घाटन न करता परत गेले असते.
संविधान मंदिरांचे लोकार्पण होत असल्याचा अभिमान वाटतो असे रामदास आठवले यांनी यावेळी केलेल्या आपल्या भाषणात म्हटले. भदंत राहुल बोधी आदींचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कारही यावेळी करण्यात आला. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या मंडळींनाही बाबासाहेबांचा हा इशारा आठवला नाही का?
राजकारणातील भक्तीला विरोध करणाऱ्या बाबासाहेबांनाच स्मरुन संविधानाचे मंदिर उभारणारे हे लोक निलाजरे तरी आहेत किंवा अत्यंत धूर्त आहेत. मंदिर उभारुन बाबासाहेबांनी संविधानाद्वारे दिलेल्या इहवादी मूल्यांचे ते एकप्रकारे थडगे बांधत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत