जगाला बुद्ध मार्ग अनुसरण्याची नितांत गरज- डॉ. डी.एस. सावंत
काल आयुष्यमान व्ही जी सकपाळ बौद्धाचार्य तसेच धम्म प्रचारक तसेच आयुष्यमान प्रसेनजीत तेलगोटे यांच्या आग्रहास्तव बुद्ध रूपे पाहण्यासाठी चेंबूरच्या सम्राट बौद्ध विहारांमध्ये गेलो असता, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुष्यमान डॉ गगन जी मलिक यांनी आमचे भव्य स्वागत केले तसेच आम्हीही त्यांचे स्वागत केले आभार मानले. त्यांचा बुद्ध सिनेमातील रोल बद्दल विस्तृत चर्चा केली व त्यांनी आपला धम्माचा प्रवास तसेच प्रवासाचे वेगवेगळे टप्पे आणि आलेले अनुभव आणि जगाला धम्माची कशी आवश्यकता आहे याचं प्रतिपादन केलं.
त्यांनी आतापर्यंत 40 हजार बुद्ध रूपे विविध संस्थांना वाजवी किमतीमध्ये दिलेली आहेत व एकूण 84 हजार बुद्ध रूपे देण्याचा प्रण केला आहे या वेळेला अनेक पदाधिकारी तसेच धम्म प्रचारक बांधव उपस्थित होते सुरुवात व शेवट ही बुद्ध पूजेने वंदनेने तसेच भीम स्तुती तसेच धम्मपालन गाथेने आयुष्यमान व्ही जी सकपाळ साहेबांनी आपल्या सुमधुर आवाजात करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
शेवटी अल्पोपराने सत्कार समारंभाची सांगता झाली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत