भारताच्या इतिहासातील पहिले परमवीरचक्र बचित्तरसिंग हे प्रेरणादायी :- पाटील
नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठया उत्साहात साजरा .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
मराठवाडा मुक्ती संग्रामदिन निजामाच्या जुलमी अन्यायाविरुद्ध भारतीय सैन्याने लढा उभा केला १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र्य झाला पण मराठवाडा मात्र निजामाच्या ताब्यात होता भारतीय सैनिकांनी निजामा विरुद्ध खुप मोठा संग्राम सुरू केला बचित्तरसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वःताच्या छातीवर गोळ्या घेत आपली लढाई सुरुच ठेवली आणि निजामाच्या सैनिकांना पळवुन लावले आणि बचित्तरसिंग नळदुर्ग आलियाबाद येथे ऐतिहासिक पुलात शहीद झाले १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा प्रदेश हैद्राबाद निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला याचा खुप मोठा इतिहास आहे हा इतिहास व शहीद बचित्तरसिंग यांचे कार्य कधी ही विसरता कामा नये कारण शहीद बचित्तरसिंग आपल्यासाठी खुप मोठी प्रेरणा आहेत यांच्या त्या शूर आठवणी आपण कधीही विसरू शकत नाही म्हणून शहीद बचित्तरसिंग व स्वतंत्र सैनिकांचे खुप मोठे स्मारक नळदुर्ग अलियाबाद येथे होणार आहे आसे परखड मत तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले .
प्रथमता शहीद बचित्तरसिंग यांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी सर्वांनी अभिवादन केले व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
नळदुर्ग येथील नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण केले याच बरोबर शहरांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात तुळजापूरचे नायब तहसीलदार संतोष पाटील मंडळ अधिकारी कुंभार तर हुतात्मा स्मारकात तुळजापूर तहसीलच्या पेशकर श्रीमती भोगे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग येथे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांनी केले तर डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचा नर्सरीचा विद्यार्थी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने इंग्लिश मधून आपलं स्पष्ट मनोगत व्यक्त केला जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील मुलीने राष्ट्रगीत सादर केले शिवाय नळदुर्ग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिरंगा ध्वजास सलामी दिली
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक स्वतंत्र सैनिकाचे पुत्र उपस्थित होते .यावेळी भाजपाचे नेते सुशांत भूमकर ,शहराध्यक्ष भिमाजी घुगे पद्माकर घोडके बबन चौधरी , रणजीतसिंह ठाकुर , स्वातंत्र सैनिक पुत्र देवानंद बनसोडे , श्रमिक पोतदार , विलास राठोड , संजय विठ्ठल जाधव , पत्रकार विलास येडगे , पत्रकार दादासाहेब बनसोडे सह नळदुर्ग शहरातील माजी सैनिकांनी तिरंगा ध्वजास सलामी दिली .यावेळी गावातील सर्व नागरिक महिला व विद्यार्थी उपस्थित होते
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग धाराशिव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत