रामोजी ग्रुपचं विजयपथावरील मार्गक्रमण निरंतर सुरूच राहील’: इच्छापत्रातून कर्मचाऱ्यांना रामोजी राव यांची भावनिक साद, सोपवली जबाबदारी
रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी त्यांच्या गौरवशाली जीवनकाळात अफाट व्यवसाय विश्व आणि मीडिया साम्राज्य निर्माण केलय. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियामध्ये पसरलेल्या या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात; त्याचबरोबर आदरातिथ्य-हॉटेल, चित्रपट, मनोरंजन तसंच FMCG क्षेत्रात रामोजी ग्रुपच्या उद्योगांचं मोठं जाळं पसरलेलं आहे.
या सर्वच उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी, माध्यम सम्राट रामोजी राव यांनी ‘जबाबदारीचं इच्छापत्र’ लिहिलं आहे. सहसा, वडील त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या मुलांना मालमत्तेचं वाटप करण्यासाठी मृत्यूपत्र लिहितात. येथे चेअरमन रामोजी राव यांनी कर्मचाऱ्यांवर जबाबदारीचं मृत्युपत्र दिलेलं आहे. जसं वडील आपल्या मुलांसाठी इच्छापत्र लिहितात, तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी इच्छापत्र लिहिलं आहे. रामोजी राव यांना त्यांच्या कंपन्यांच्या समूहातील कर्मचारी हे त्यांच्या मुलांच्यापेक्षाही प्रिय होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत