पूजा खेडकर यांना अटकेपासून न्यायालयाकडून दिलासा; “UPSC ला काढण्याचा अधिकार…”
बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयानं 5 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशामुळं पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळालाय.
UPSC ला काढण्याचा अधिकार नाही : आज झालेल्या सुनावणीदरम्यान पूजा खेडकर यांची बाजू मांडणारे वकील म्हणाले, “एकदा नियुक्ती झाल्यानंतर यूपीएससी कोणालाही काढून टाकू शकत नाही. काढण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडं आहे. 2012 ते 2022 पर्यंत पूजा खेडकर यांनी नावात किंवा आडनावात कोणताही बदल केलेला नाही.” तसंच पूजा खेडकर यांच्यावरील सर्व आरोप हे वकिलांनी फेटाळून लावले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत