झेड प्लस सुरक्षेवर शरद पवार यांचा आक्षेप; सुरक्षेतही काय चाललंय राजकारण?
केंद्रीय गृहमंत्र्यांकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांना असलेला धोका लक्षात घेता त्यांनाही सुरक्षा देण्यात येत असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात शरद पवार यांना 15 ऑगस्ट रोजी पत्र पाठवण्यात आलं होतं, तर शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची बैठक झाली. या बैठकीला सीआरपीएफ चे महासंचालक कमलेश सिंह, गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल तसंच इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी उपस्थित होते. शरद पवार यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ती वाढवून त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. शरद पवारांना असलेल्या धोक्यामुळे ही सुरक्षा वाढवली असल्याचं केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केलं. हा निर्णय का घेण्यात आला याची माहिती शरद पवार यांना देण्यात आली. तसंच पवार यांच्या निवासस्थानाच्या भितींची उंची वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. एकूणच पवार यांना गंभीर धोका असल्याचं चित्र या बैठकीत मांडण्यात आलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत