मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठीचं सर्वेक्षण राज्यभर सुरू…

३१ जानेवारीपर्यंत चालणारं हे सर्वेक्षण ३६ जिल्हे,२७ महानगरपालिका आणि ७ कॅन्टॉन्मेंट बोर्डांमधे होणार आहे. राज्यातले एकूण सव्वा लाखाहून अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकारी यात सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात या समाजाचं सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून सुरू झालं. दरम्यान,मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेले मराठा बांधव आज पुण्यात दाखल झाले. पुणे, पिंपरी-चिंचवडमधून हा मोर्चा मुंबईकडे रवाना होईल. उद्या त्यांचा मुक्काम लोणावळ्यात होईल. यामुळं स्थानिक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल केला आहे. हा मोर्चा आज रांजणगाव इथून कोरेगाव भीमामार्गे चोखीदाणी- खराडी इथं मुक्काम करेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत