मुख्यपानराजकीय

मुंबईसह देशभरात ईडीचे ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त, सेलिब्रिटींनीही हवालामार्फत पैसे स्वीकारले.

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले असून याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात सादरीकरण करण्यासाठी १४ चित्रपट कलाकार व गायकांनी हवालामार्फत रक्कम घेतली होती.ईडीने याप्रकरणी मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने महादेव ऑनलाईन बेटींग ॲपशी सबंधित ठिकाणी छापे टाकले असून त्यात मुंबईसह भोपाळ, कोलकाता परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील रहिवासी असलेले रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ॲपचे प्रवर्तक असून या कारवाईमध्ये तब्बल ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आले असून अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!