दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

कृष्णाजी केळुसकर गुरुजी जन्मदिन

जन्म – २० ऑगस्ट १८६० (वेंगुर्ला,सिंधुदुर्ग)
स्मृती – १४ ऑक्टोबर १९३४

कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे मराठी लेखक होते. केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जि.सिंधुदुर्ग येथे जन्मलेले ते मराठीतील आद्य शिवचरित्रकार होते. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहेत. १९०३ साली केळुसकरांनी छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. याची पहिली आवृत्ती १९०७ साली मराठा प्राविडंड फंडातर्फे प्रसिद्ध झाली. तत्कालीन उपलब्ध असलेली अनेक कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार याचा अभ्यास करून त्यांनी ते ६०० पानी शिवचरित्र लिहिले. या आवृत्तीला शाहू महाराज यांनी मदत केली. कागल, बडोदा संस्थानांनी यासाठी त्यांना पारितोषिके दिली. हे चरित्र हिंदी व गुजराती भाषेत अनुवादित होवुन प्रसिद्ध झाले. शिवाजी महाराजांची नवी उपलब्ध माहिती घेवुन मूळ ग्रंथात सुधारणा करून नवी आवृत्तीही प्रसिद्ध करायला घेतली. मनोरंजनकार का.र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही झाली. पण यात त्यांना प्रचंड कर्ज झाले.

इंदोर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी तत्कालीन रु. २४०००/- देवून केळूसकरांना कर्जमुक्त तर केलेच पण इंग्रजी आव्रुत्तीच्या ४००० प्रती घेवून जगभरच्या मुख्य इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या. या ग्रंथाच्या आजवर ७ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असुन एक आवृत्ती बामसेफनेही संपादित प्रसिद्ध केली आहे. वरदा प्रकाशनाने १९९१ ते २०१० या काळात ४ आवृत्त्या प्रसिद्ध केल्या असून मूळ स्वरुप जपले आहे. केळुस्करांनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कौतुक संभारभात भेट म्हणून दिले. साहित्य- आध्यात्मिक ज्ञानरत्नावली, गौतम बुद्ध यांचे चरित्र, तुकाराम महाराजांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज, फ्रांसचा जुना इतिहास, सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!