बहुजन हिंदूंनो,ना राम तुमचा आहे ,ना श्रीकृष्ण तुमचा आहे. कारण यांचा अवतारच मुळात ब्राह्मणांचे रक्षण करून त्यांचे राज्य स्थापन करण्याचा हेतू आहे.
प्रा. गंगाधर नाखले
आम्हा भारतीयांना राम आणि कृष्ण यांची माहिती वाल्मीकि रामायण आणि गीता या ग्रंथांच्या माध्यमातून मिळालेली आहे. अनेक इतिहासकार म्हणतात रामायण महाभारत हे काल्पनिक आहे. टीव्ही सिरीयल च्या माध्यमातून रामायण आणि महाभारत प्रत्येक घरातील व्यक्तीला माहिती झालेले आहे. परंतु टीव्ही सिरीयल च्या माध्यमातून जी माहिती आम्हाला राम आणि कृष्ण यांच्या विषयी देण्यात आलेली आहे ती माहिती आणि वाल्मीकि रामायण, गीता या ग्रंथांमधील माहिती त्याच्यात खूप फरक आहे. उदाहरणार्थ राम शबरी ची उष्टी बोर खाण्याची गोष्ट आपण ऐकलेली आहे तीच आपण टीव्ही सिरीयल मध्ये पाहिलेली आहे, परंतु वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस या दोन्ही ग्रंथांमध्ये या प्रसंगाचा कुठेही उल्लेखच नाही.
त्यामुळे टीव्ही सिरीयल वरून रामायण महाभारत पाहून आम्हाला श्रीकृष्ण आणि राम समजले असे म्हटले तर ते साप चुकीचे ठरणार आहे. अनेक बहुजन भोळ्या भाबड्या हिंदूंना असे वाटते की राम यांनी जो अवतार घेतलेला आहे तो आमच्या रक्षणासाठी परंतु मित्रांनो ही गोष्ट सत्य नाही. गीता प्रेस गोरखपुर ने प्रकाशित केलेले वाल्मीकि रामायण मधील अरण्य कांड, सर्ग 9, श्लोक 18,19 तुमच्यासाठी खाली देत आहे.
राम म्हणतात – ‘सीते ! मैं अपने प्राण छोड सकता हुं, तुम्हारा और लक्ष्मण का परित्याग कर सकता हुं, अपनी प्रतिज्ञाको, विशेषतः ब्राह्मनोंके लिये की गई प्रतिज्ञा को मै कदापी नही तोड सकता ||
‘इसीलिए ऋषियोंकी रक्षा करणा मेरे लिये आवश्यक कर्तव्य है, विदेहनंदिनी ! ऋषियोंके बिना कहे ही उनकी मुझे रक्षा करनी चाहिये थी; फिर जब उन्होने स्वयं कहा और मैंने प्रतिज्ञा भी कर ली, तब अब उनकी रक्षा से कैसे मुंह मोड सकता हूं’
मित्रांनो, वरील दोन श्लोक वाचल्यानंतर तुम्हाला असे वाटत नाही का की, जी व्यक्ती (राम) ब्राह्मणांच्या रक्षणासाठी आपल्या पत्नीचा आणि भावाचा त्याग करण्याची भाषा बोलतो तो व्यक्ती तुमचा कसा काय होऊ शकतो. जो राम तुमचा नाही तुम्ही त्याला जबरदस्तीने आमचा का म्हणत आहात.? तुमच्या खात्रीसाठी वाल्मिकी रामायणाची फोटोकॉपी खाली दिलेल्या आहे.
हीच गोष्ट श्रीकृष्ण यांनी गीतेमधून सांगितलेली आहे. श्रीमद्भागवत गीता शंकर भाष्य हिंदी अनुवाद, गीता प्रेस गोरखपुर या धर्मग्रंथा च्या पृ .क्र. 14 वर म्हटलेले आहे, ते खालील प्रमाणे-
‘…… भूलोक के ब्रह्मकी अर्थात भूदेवों (ब्राह्मनों)-ब्राह्मणत्वकी रक्षा करनेके लिए श्रीवासुदेवजीसे श्रीदेवकीजीके गर्भमें अपने अंशसे (लीलाविग्रहसे) श्रीकृष्णरूपमें प्रकट हुए | यह प्रसिद्ध है|
ब्राह्मणत्वकी रक्षासे ही वैदिक धर्म सुरक्षित रहा सकता है,
क्युकी वर्णाश्रमोंके भेद उसी के अधीन है |’ तुमच्या खात्रीसाठी फोटोकॉपी खाली दिलेली आहे.
संकट समई तुम्ही या दोन्ही देवतांची आराधना केली आणि ते जर तुमच्या रक्षणासाठी धावून आले नाही तर दोष त्यांना देऊ नका कारण ,दोष तुमचा आहे.
प्रा. गंगाधर नाखले
06/08/2024
9764688712
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत