राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार त्यांचे सर्व साहित्य याचा अभ्यास करावा मग ते बेताल बोलणार नाहीत
श्रीपूर
बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
महाराष्ट्राचे पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील एक जाणकार अभ्यासक थोर मानवतावादी विचारवंत साहित्यिक परिवर्तनवादी समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य त्यांचे विचार व समाजांतील ढोंगी बदमाश लोक गोरगरीब दिन दलित मागासवर्गीय यांना दैन्य दारिद्रय अंधश्रद्धा यांच्या चक्रव्यूहात कसे ढकलून स्वःताच्या पोळी वर तुपाची धार ओढून कसे ऐश आरामात जगतात देवा धर्माच्या नावावर ते कसे गलेलठ्ठ बनतात हे प्रबोधनकार ठाकरे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहून बोलून सप्रमाण सिद्ध करुन दाखवले आहे कुठे प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा कुठं त्यांची समाजाप्रती आस्था आणि त्यांचे नातू राज ठाकरे यांची विचारधारा राज ठाकरे यांनी अगोदर प्रबोधनकार ठाकरे समजून घेतले पाहिजेत अभ्यासले पाहिजेत कारण ते सध्या जे बेताल बोलून एका विशिष्ट वर्गाची तळी उचलण्याची धडपड करतात ते त्यांच्या लक्षात येईल
आरक्षण या विषयाचा अभ्यास नाही मंडल आयोग माहीत नाही देशात किती जाती प्रवर्गातील घटक जाती त्यांच्या मागण्या त्यांची सद्यकालीन अवस्था दारिद्र्य माहीत नाही त्यांचं असं झालं महालात राहून ते पडक्या झोपडीचे वर्णन करण्याचा त्यांचा नाटकी प्रयोग सुरू आहे त्यांनी त्यांच्या गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील कोहीनूर मीलची जागा साडे चारशे कोटीना कशी घेतली ते पैसे कुठून मिळवले हे महाराष्ट्रातील जनतेला प्रामाणिक सांगावे तेव्हा महाराष्ट्रात आजही कित्येक लोक गरीबी दारिद्य्र अवस्थेत कसे जगतात आजही भटक्या उपेक्षित लोकांना टिचभर पोटासाठी चोरी करून पोट भरावं लागतं रहायला जागा नाही.
पाच पन्नास हजार रुपये कर्ज न फेडता येत नसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळतो हे प्रश्न हा विषय राज ठाकरे सोयीस्कर विसरतात आणि अतिशय अज्ञानामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची अजिबात गरज नाही हे असंबद्ध बडबड करतात झोपी गेलेला जागा झाला या उक्तीप्रमाणे महिन्या चार महिन्यांनी सभा घ्यायची व पोकळ भाषणे करायची या पलीकडे महाराष्ट्रात राज ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या हितासाठी भल्यासाठी विकासासाठी काय योगदान राहिले आहे भाषणं करून व नक्कल करून टिंगलटवाळी करून दरडावून व ओरडून बोललं म्हणजे पराक्रमी राज ठाकरे महाराष्ट्र ताब्यात घेईन असे समजतात काय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत