कुलसचिव नियुक्ती प्रकरण
अॅड. कुलदीप आंबेकर
कृष्णा पानसे नावाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गठित केली होती. या समितीसमोर आज दुपारी ‘स्टुडंट हेल्पिंग हँड्स’ ने सात महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले.
कायदेशीर बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. या नियुक्तीवर आमचा आक्षेप का आहे, हे लेखी स्वरूपातही सादर केले. आम्हाला असे दिसते की ही समिती फक्त नामधारी आहे. विद्यापीठ प्रशासन फक्त प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. तक्रारदारांना आम्ही पुराव्यासह बोलावले होते, परंतु त्यांनी सादर केलेल्या पुराव्यात सबळ आधार नाहीत, असे उद्या काढला जाणारा निष्कर्ष असू शकतो. हेच नियोजन असल्याचे दिसते. हाच व्यक्ती कुलसचिव म्हणून निवडावा यासाठी राजकीय दबाव आहे.
कुलगुरू सुद्धा हतबल झाले आहेत, असे मला आज भेटल्यानंतर जाणवले. ते म्हणाले की, “कुलदीप स्वतःहून अशा व्यक्तीने यात येऊ नये, पण काय करणार?” त्यांची इच्छा आहे की कलंकीत व्यक्ती नको, पण व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांच्या दबावामुळे तेही निराश झाले आहेत.
यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, या व्यक्तीने मुलाखतीच्या वेळी चारित्र्यप्रमाणपत्रात त्यांच्यावर चालू असलेल्या चौकश्या आणि आयोगाच्या कार्यवाहीची माहिती लपवली आहे. येथेच एक गैरप्रकार होऊ शकतो.
त्यामुळे सदर व्यक्तीने विद्यापीठाची फसवणूक केली आहे. त्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. विद्यापीठाने मुलाखतीला आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती उघड करावी आणि माहिती लपवलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत. त्यामुळे या व्यक्तींचे पाय आणखी खोलात जातील.
या प्रकरणात संबंधित व्यक्तीची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी गुप्त समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावरच आमचा स्पष्ट आरोप आहे. राज्यपाल महोदयांनी याकडे लक्ष द्यावे. अन्यथा भविष्यात अशा नियुक्त्यांचा पायंडा पडेल.
अॅड. कुलदीप आंबेकर
अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड्स
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत