
न्यूयॉर्क : लातूर चे माजी खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील बफेलो यूनिवर्सिटी मध्ये बॅचलर ऑफ बायोमेडिकल च्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत आहे. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत रिया विजयकुमार गायकवाड ही प्रचंड मतानी विजयी झाली आहे. बारा सदस्या साठी निवडणूक झाली होती. या बारा मधे भारतीय दोन विद्यार्थी आहेत. त्यात रिया गायकवाड ही निवडून आली आहे. तिच्या निवडीबद्दल तिचे कौतुक होत आहे.
लातूर च्या वाले इंग्लिश मीडियम मधे प्राथमिक आणि हायस्कूल चे शिक्षण घेतली असून, वर्गामध्ये नेहमी पाहिली येणारी विद्यार्थीन होती. ती कॉलेज ला शिकत असताना रोटरी च्या माध्यमातून सोशल वर्क केली आहे. काहीतरी वेगळे शिक्षण घेतले पाहिजे म्हणून भविष्यात ज्या शिक्षणाची गरज भासणार आहे असे बायोमेडिकल शिक्षण निवडले आणि जगातली सर्वात चांगली बफेलो यूनिवर्सिटी मधे तिने आपल्या बुद्धिच्या जिवावर प्रवेश मिळवला. आणि लातूर ची मुलगी सात समुद्रापार आपले नेतृत्व आता विद्यापाठाच्या सिनेटवर करणार आहे. रिया गायकवाड ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत चळवळीत काम केलेले आदर्श शिक्षक बळीराम शिवराम गायकवाड यांची नात आणि समृद्धी महामार्ग चे तांत्रिक प्रमुख एमएसआरडीसी चे सह महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड आणि लातूरचे माजी खा. प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आहे.
रिया गायकवाड हिच्या या यशानंतर त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार यांच्याकडून रिया व तिचे वडील विजयकुमार गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत