दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

तुझे जाणे, धन्य धन्य जाहले!

जानेवारी 1974 साल उजाडलं ते थंडीच्या दिवसांमध्ये, तप्त वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवीत. दलित पॅंथर या संघटनेचे

आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे ,तर संपूर्ण जगामध्ये त्याची ख्याती पोहोचली होती. दलित पॅंथर आदोलनामुळे महाराष्ट्र शासनाचे धाबे दणाणले होते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात एक दोन अपवाद वगळता ,आंबेडकरांच्या चळवळीचा नेता हे प्रस्थापित आणि राज्यकर्ते ठरवत होते.
दलित पॅंथरची चळवळ स्वयंभू असल्यामुळे त्या चळवळीची वाटचाल, कार्यक्रम आणि ध्येय ठरवणे ,या संपूर्ण चळवळीच्या नेत्यांच्यावर अवलंबून होते. अशा स्वयंभू चळवळीला रोखणे शासन स्तरावर अशक्य गोष्ट वाटत होती. हे वादळ शमले जावे म्हणून शासनाने एक फार चांगली खेळी केली. त्यावेळेला आंबेडकर चळवळीचे एक माननीय नेते आर. डी .भंडारे साहेब, हे वरळी मतदारसंघामधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. सत्ताधाऱ्यांनी त्यांना खासदारकीचा राजीनामा घेऊन त्यांना बिहारचे राज्यपाल पद दिले. तुमच्या माणसाला आम्ही राज्यपाल पद दिले म्हणजे आंबेडकरी चळवळ कुठेतरी शांत झाली पाहिजे, अशा प्रकारचा तो डाव होता. भंडारे साहेबांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे ती जागा रिक्त झाली. त्या जागेवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम ठरविला गेला होता. आणि त्या
निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे रामराव आदिक, त्यांच्याविरोधात सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या रोझा देशपांडे अशी फार अटीतटीची निवडणूक समोर उभी राहिली होती. त्या निवडणुकीवर दलित पँथरने बहिष्कार जाहीर केला. वरळी च्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये पारंपारिक काँग्रेसची मते रामराव आदिकाना मिळणार होती, आणि त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या रोझा देशपांडेना सर्व विरोधी पक्षाची मते मिळणार होती. त्या निवडणुकीमध्ये बॅलन्सिंग ठरणारे मतदान हे आंबेडकरी समाजाचे होते. आंबेडकरी समाजाचे मतदार ज्या पक्षाला मत देतील तो उमेदवार निवडून येणार हे अगदी निश्चित ठरलेले होते. दलित पॅंथरच्या निवडणूक बहिष्काराच्या निर्णयामुळे रामराव आदिकांची निवडणूक धोक्यात आली होती. दलित पॅंथरचा निवडणूक बहिष्कारचा निर्णय कुठल्याही तऱ्हेने मागे घेतला जावा म्हणून, सत्ताधारी काँग्रेस पक्षाची धावपळ उडाली होती. आमचा निवडणूक बहिष्कार ही भूमिका जाहीर करण्यासाठी दलित पॅंथरची आयोजित सभा वरळीच्या विभागात आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये ,जे राजा ढालेच शेवटचं भाषण होता कामानये म्हणून, त्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि गोंधळ सुरू झाला. त्या गोंधळामध्ये एस .आर. पी. चे सैनिक स्टेजवर आले आणि त्यांनी राजा ढालेच्या डोक्यामध्ये लाठी मारली.त्या लाठी मारामुळे राजा ढाले यांच्या डोक्याला अठरा टाके पडले, एवढी मोठी जखम झाली होती.दलित पॅंथरचा निवडणूक बहिष्कार का ?ही भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचलीच गेली नाही पाहिजे, अशा प्रकारची ती खेळी झाली आणि दलित पॅंथरचा नेता राजा ढाले याला तुरुंगवास आणि नंतर औषध उपचार करण्यासाठी गुंतून पडावे लागले. राजा ढालेला झालेली मारहाण आणि त्याला करण्यात आलेली अटक याच्या निषेधार्थ, 10 जानेवारी 1974 रोजी भोईवाडा मधून मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. रागा रागाने पेटलेला शहीद भागवत जाधव त्या मोर्चात सामील झाला होता. त्याच मोर्चामध्ये परेलच्या नाक्यापासून पुढे मोर्चा सरकला आणि मोर्चावर दगडफेक सुरू झाली. त्या दगडफेकींमध्ये भागवत जाधव हा धारातीर्थी पडला. दलितांचा मोर्चात झालेल्या दगडफेकीचा प्रकार आणि राजा ढालेची झालेली मारहाण याचा मतदानावर व्हायचा तो बरोबर परिणाम झाला आणि रामराव आदिक निवडणुकीमध्ये पराजित झाले. दलितांच्या लढ्यामध्ये भागवत जाधव हा पहिला शहीद झाला. अशी भागवत जाधवच्या
आत्मबलिदानाची घटना इतिहासा मध्ये नोंद झालेली आहे. त्या घटनेपासून दलित पॅंथरच्या संघटनेवर परिणाम व्हायला पाहिजे तोच परिणाम झाला आणि ती घटना म्हणजे दलित पॅंथरच्या फुटीची मुहूर्त घटना ठरली असेच म्हणावे वाटते.प्रस्थापित एवढेच करून थांबले नाही तर दलितांची जी स्वयंभू संघटना समाजात उभी
होत होती ,ती कायमचीच फुटावी, म्हणून शासनकर्त्यांनी नामांतराचा प्रश्न उभा केला. तो प्रश्न शासनकर्त्यानी जाणून बुजून प्रलंबित ठेवला आणि दलित पॅंथर संघटना जरी फुटली तरी त्या दलितांच्या संघटनेत सहभागी झालेला , भडकलेला तरुण, तो शांत बसणारा नव्हता. नामांतर झालेच पाहिजे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरचे तरुण रस्त्यावर उतरले होते आणि शासनाची पुरी नाकेबंदी करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. हा नामांतराचा लढा पेटत राहिला नाही पाहिजे .हा कुठेतरी थांबलाच पाहिजे, म्हणून सर्व तऱ्हेचे प्रकार शासनाकडून आयोजित केले जात होते. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आमचे पुढारी कोण? हे ठरविण्याचे काम आजपर्यंत सत्ताधारी करत आलेले आहेत. ह्याच धोरणाप्रमाणे त्यांनी आमच्या मधला जो विकाऊ ठरू शकतो, अशा एका पोट भरू तरुणाला आमचा नेता म्हणून पुढे आणले आणि 1990 सालच्या निवडणुकीनंतर त्याला सरळ मंत्रिपदच देऊन टाकले. जो विकला गेला होता त्याने शासनाची तरफदारी करणे सुरू केले आणि त्याने जाहीरपणे सभांमधून लोकांना सांगत सुटला की नामांतर विषय डेड विषय झालेला आहे. आता कोणीही त्याच्या साठी आंदोलन करू नये. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या स्वबळावर उत्तर नागपूर मधून निवडून आलेले आमदार उपेंद्रजी शेंडे यांनी नामांतर झालेच पाहिजे म्हणून आमरण उपोषणाला सुरुवात केली. समाजामध्ये मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. एक मंत्री पदावर विराजमान झालेला आणि आपला नेता म्हणून मिरवणारा एकीकडे म्हणतो आहे की ,नामांतर विषय हा डेड विषय झालेला आहे आणि स्वबळावर निवडून आलेले आमदार उपेंद्र शेंडे म्हणतात की नामांतर झालेच पाहिजे .तो आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि आम्ही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही.
आपल्यातल्या त्या पोट भरून नेत्याने शासनाचं शासनाची तळी उचलून घेण्याचं काम पार पाडले आणि त्याने त्याच्यातर्फे जाहीर केले की , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार सुद्धा चालेल. अशाप्रकारे नामांतर लढ्याला संपविण्याचे काम केले. त्यामुळे नामांतर विरोधक आणि नामांतर पाहिजे म्हणून लढणाऱ्यांना शांत केल्याचं यशस्वी नाटक केलं गेलं .आणि स्वाभिमानाची चळवळ संपविण्याचे काम या नेत्याने केले. नामांतर न करता नाम विस्तार केला आहे .ही गोष्ट फार संतापजनक आहे आणि आज पर्यंत हा सल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व अनुयायी जीवामध्ये बाळगीत आहे . प्रत्येक वर्षाच्या 10 जानेवारीला शहीद भागवत यांचा स्मृतिदिन साजरा होत असताना , मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या आंबेडकर अनुयायी समाज,घडलेल्या इतिहासाची उजळणी करीत असतो. चळवळीचा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रकारे अपमान केलेला आहे. या भावनेने आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी पेटून उठत आहे . ह्या नामांतराच्या लढ्यामुळे एक वास्तव प्रकर्षाने फार पुढे आलेले आहे. ते म्हणजे आम्ही लढा लढलो, टोळ्या टोळ्यानी ,अलगपणे लढलो .त्याचा परिणाम आमच्या सत्याग्रहींना बदडले गेले, ठोकले गेले ,कितीतरी कार्यकर्ते शहीद झाले .त्याची सरकारकडे नोंद नाही. मात्र माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्याकडे त्या सगळ्या शहिदांची आणि ज्या ज्या आमच्या कार्यकर्त्यांना धारातीर्थी पाडण्यात आले त्या सर्व नोंदी माझ्याजवळ आहेत. आम्ही लढलो म्हणजे, आम्ही भूमिका घेतली, असंच ते चित्र आहे. आमचे कार्यकर्ते संघर्ष करणारे मारले गेले .परंतु आम्ही टोळी टोळीने लढा दिल्यामुळे, आम्ही समोरच्यांचा एकही मुर्दा पाडू शकलो नाही .आम्ही जर समोरच्यांचा दहा नाही ,पाच नाही, किमान एक जरी मुर्दा पाडला असता तर, आंबेडकर चळवळीला एक वेगळी धार आली असती .परंतु परिणाम वेगळाच झाला. आमच्या संपूर्ण आंबेडकर अनुयायांचा सगळ्या अर्थाने भ्रमनिरास झालेला आहे .आम्ही काही करू शकत नाही अशी एक भावना सर्वत्र झालेली आहे. कारण आमचे पुढारी विकले जातात हे वास्तव आहे.म्हणून आंबेडकर चळवळीवर एक प्रकारची निराशा पसरलेली आहे. आजचे वास्तव असे आहे की, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा विरोध करणारी जातीवादी, मनुवादी मंडळी, शासन करती झालेली आहे. सर्व व्यवस्था त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांनी धर्मनिष्ठ लोकशाहीचा चित्र उभे केलेले आहे .धर्मनिष्ठ लोकशाही म्हणजेच हुकूमशाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सविधान प्रमाण मानणारे लोक बिळात जाऊन बसले आहेत.ईडीच्या भूमिकांमुळे विरोधी पक्ष सुद्धा हतबल झालेला दिसतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी गटागटामध्ये विभागले गेले असल्यामुळे आणि खंबीर नेतृत्व नसल्यामुळे भारताचे संविधान, त्याच रक्षण करणं हे अवघड झाले आहे. तरीसुद्धा संविधानाचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. जबाबदारी आहे. याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. मात्र आज आम्हाला फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागते ,याचं कारण आमच्यामध्ये एकजूट नाही आणि आम्हाला खंबीर नेतृत्व नाही. जीवाची बाजी लावून आम्ही भारताचे संविधान कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलू देणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असणाऱ्या आम्हा सर्वांची भूमिका आहे. तो दिवस आता दूर नाही ,की ज्या दिवशी आमचा संपूर्ण समाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरणार, हे आता दूर राहिलेले नाही.
शहीद भागवत जाधव याचा स्मृतिदिन म्हणजे, प्रबोधनाचा तो एक लहानसा दिवा आहे . त्या लहानशा दिव्याने एक एक दिवा पेटत आहे .भागवत जाधव चा छोटा भाऊ सुमेध जाधव ह्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेत असतो. त्याला मी कित्येक वेळा सांगत आलेलो आहे की सुमेध हा कार्यक्रम आयोजन करण्याचं काम तू एकटा करत जाऊ नको तू या कार्यक्रमासाठी तुझ्या, माझ्यासारख्या विचाराची सर्व समाजामध्ये पेटून उठणाऱ्या कार्यकर्त्यांची बांधणी करण्याची अत्यंत गरज आहे. स्मृतिदिनाचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुमेधला तिथे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना जोडून घ्यावे लागते. कार्यकर्ते या आयोजन कार्यक्रमाची जबाबदारी घेतात म्हणून ते आपापल्या वृत्तीप्रमाणे वागत असतात .काल झालेल्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमांमध्ये त्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाला एखाद्या व्याख्यानमालेचे स्वरूप आणले म्हणजे, माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे झाले. स्मृतिदिनाचे आयोजन करण्यासाठी संस्थात्मक बांधणी व्हावी म्हणून, आपल्यापैकी दरमहा शंभर रुपये देणारे, असे 25 जण जरी एकत्र आले तर वर्षाला 30 हजार रुपये जमा होतात. एवढ्या रकमेमध्ये आपण फार चांगल्या प्रकारे अभिवादन सभेचे आयोजन करू शकतो ,त्या सभेद्वारे संपूर्ण समाजाला पुढील वाटचाली संबंधी मार्गदर्शन करण्यास सोपे होईल ,कारण या अभिवादन सभेच्या कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व विचाराचे सर्व गटातटाचे लोक एकत्र जमा होत असतात. त्या सर्वांच्या मध्ये समन्वय साधून पुढील वाटचालीसंबंधी दिशा ठरविणे आणि कार्यक्रमाची आखणी करणे सहज शक्य होऊ शकते. ही पोस्ट ज्या ज्या वाचकांच्या वाचण्यात येईल त्यांनी स्वयंस्फूर्तीने या योजनांमध्ये सहभागी होण्याची संमती आणि आपला मोबाईल क्रमांक देण्याची विनंती करण्यात येत आहे.

 सयाजी वाघमारे 

ज्येष्ठ पॅंथर/ रिपब्लिकन नेते
समाज भूषण/
‘मी प्रथमत: भारतीय, आणि अंतिमत: भारतीय’ अभियान’ प्रमुख

@@@@@@@@@@
संपर्क क्रमांक ,
9892066967.
☄️☄️☄️☄️☄️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!