महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

2024 ची लोकसभा निवडणूक म्हणजे अल्पसंख्यांकांचा विजय ……….

कालच्या पोस्टचा उत्तरार्ध..,…

मोदी – शहा या जोडगोळीला एवढी शक्ती कुठून प्राप्त झाली?
या प्रश्नाचे उत्तर आमच्या ( भारतीय जनतेच्या ) जाती – धर्माच्या कोरड्या अहंकारात आहे. ज्यामुळे आम्हाला स्वातंत्र्यापूर्वी हजारो वर्षे परकीयांच्या राजकीय आणि विशेषतः आर्याच्या कुसांस्कृतिक गुलामीत टाकले होते……!
त्याचे परिणाम आम्ही आजही आम्ही भोगत आहोत. परंतू , युगानुयुगे इतिहासात कधीतरी स्वच्छतेची लाट येते, आणि सर्वकाही धुवून जाते. आणि त्यानंतर पुन्हा ही प्रतीक्रांतीची लाट येऊन होत्याचं नव्हतं करून टाकण्याचा प्रयत्न करते. परंतू , एखादा लाकडाचा ओंडका पुरात वाहून जाणाऱ्या माणसाला जीवदान देतो. असंच कांहीसं या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झालं.
जेंव्हा या जोडगोळीने भारताला प्रायव्हेट लिमिटेड करण्याचे स्वप्न बघितले. तसे प्रयत्न पूर्णतः केले, त्या यशाच्या जवळ जाऊन पोहचण्याचा शेवटचा घणाघात टाकला. परंतू , म्हणतात ना फांदी तुटण्याचा आणि कावळा उडण्याचा योगायोग घडतो. अगदी तसेच या निवडणुकीत घडले.
देशातल्या प्रत्येक धर्मातल्या अल्पसंख्यांकांनी ही मतदानाची शेवटची संधी समजून 100% मतदान केले. संविधानविरोधी शक्तीला नामोहरम करण्याची शेवटची संधी समजून मतदान केले. या जोडगोळीने संपूर्ण व्यवस्थाच हायजॅक केलेली असतांना…….
लोकशाहीचे चारही कॉलम ढासळण्याच्या बेतात असतांना….
स्वतःचे अस्तित्व कायमचे पुसण्याची शक्यता निर्माण झालेली असतांना…..
जरी इंडिया आघाडी गरीब असली……
अल्पसंख्यांकातील राजकीय नेतृत्व जरी कोणत्याही कारणाने सैरभैर झालेलं असलं…….
तरी अल्पसंख्यांकांनी हा दृढसंकल्प केलेला होता की, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण 65 वर्षाच्या आयुष्यात सर्वात महान काम करून या देशाला कुणीही आणि कधीही गुलाम बनवणार नाही याची खबरदारी घेऊन जे……
🌹भारताचे संविधान 🌹
निर्मिले होते. त्याला जो धोका या जोडगोळीने निर्माण केला होता. त्या शक्तीला संपवण्याचा निर्धार या……

🌹बौद्ध अल्पसंख्यांक समुदाय *🌹
🌹मुस्लिम अल्पसंख्यांक समुदाय 🌹
🌹ख्रिश्चन अल्पसंख्यांक समुदाय 🌹
🌹आणि इतर सर्वच संविधानवादी अल्पसंख्यांक समुदायाने 🌹

 आपापले  वैचारिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक मतभेद बाजूला ठेऊन ही निवडणूक स्वतः हातात घेऊन 100% टक्के मतदान करून संविधानविरोधी शक्तीला संपविण्यासाठी.........

😠अब की बार 400 पारच्या नाऱ्याला 😠

240 वर आणून ठेवले. याचे श्रेय आज जरी इंडिया आघाडी घेत असली तरी त्याचे श्रेय केवळ आणि केवळ या अल्पसंख्यांकांच्या निर्धाराने मतदान करण्यालाच जाते ( यामध्ये EVM हटविली असती तर वरचे 40 जागा सुद्धा मिळणे या जोडगोळीला मुश्किल झाले असते ) …. 🙏
तुम्ही ( इंडिया आघाडी ) कितीही हातात संविधानाचे पुस्तक हातात घेऊन सभेत मोदी -शहाच्या विरुद्ध प्रचार केला म्हणून जिंकलो असा आव आणत असाल तर तो साफ खोटा आहे. कारण कधी काळी अर्धशतक तुमचेच राज्य होते. तेंव्हा जर तुम्ही 100% देश संविधानावर चालवीला असता……
तर हे संविधानविरोधी शक्ती RSS, जनसंघ आणि भाजपचे पिल्लू जन्मलेच नसते…!
परंतू , तुम्ही सुद्धा ( केंद्रात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी ) जास्त आकाशात उडू नका. जमिनीवर पाय ठेऊन जनतेची नाळ तोडू नका. नाहीतर तुमचीही गत यांच्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही……!
कारण , ये पब्लिक है, सब जाणती है!
म्हणून हा विजय केवळ आणि केवळ संविधानवादी शक्तीचा केवळ अल्पसंख्यांकांच्या भूमिकेमुळेच झाला. म्हणून याचे श्रेय केवळ आणि केवळ या सर्वच अल्पसंख्यांकांना 100% जाते….. 🙏🙏🙏
ज्याप्रमाणे अमेरिकेतील नागरिक इंग्रजाविरुद्ध देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून घराच्या खिडक्यातून इंग्रज सैन्यावर गोळीबार केल्यामुळे अमेरिका स्वतंत्र झाली………!
म्हणजे एखाद्या युद्धात सर्वसामान्य जनता, मग ती अल्पसंख्यांक जरी असली तरी, ती जेंव्हा त्या युद्धात समर्पित होते…….
तेंव्हा समोरची शक्ती कितीही बलाढ्य असली तरी चारी मुंड्या चीत झाल्याशिवाय राहत नाही….!
मग ते युद्धाचे मैदान असो किंवा निवडणुकीचे मैदान असो……
मानवतावाद्यांचा विजय ठरलेलाच……!!!

म्हणून सर्व अल्पसंख्यांक वर्गाला माझ्यातर्फे आणि संपूर्ण संविधानवाद्यातर्फे मानाचा……

🌹सॅल्यूट 🌹

असेच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे, निदान मोक्याच्या वेळी…..

जागृतीचा जबाबदार लेखक :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!