अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती साठी घातलेल्या असंवैधानिक अटी रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार – वंचित आघाडी.

राजेंद्र पातोडे,
अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती साठी घातलेल्या असंवैधानिक अटी रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी
मुख्यमंत्री, मुख्य सचिव, समाज कल्याण मंत्री, आणी आयुक्त सामाजिक न्याय विभाग पुणे ह्यांना निवेदना द्वारे दिला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण,(महाराष्ट्र शासन) अंतर्गत अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४- २०२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.मात्र त्यासाठी नियम सुसूत्रीकरण करण्याचे नावावर आपण अनेक घटनाबाह्य नियम घालून दिले आहेत. त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही.
राज्य सरकारने परदेशी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीचे नियम आणखी कठाेर करण्याचे नावावर ह्या समूहाला उच्च शिक्षण नाकारणारे नियम तयार केले आहेत .१० वी पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणात ७५ टक्के गुण असणारेच परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहेत. यासह शिष्यवृत्तीची मर्यादा ३० व ४० लक्ष रुपये करण्यात आली आहे. या नवीन नियमांमुळे आंबेडकरी विद्यार्थी मध्ये राेष असून राज्य सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांच्या सवलतींवर घाव घालून परदेशी शिक्षणाचे मार्ग बंद करण्याचा डाव खेळल्याचा आमचा आराेप आहे.
राज्य सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नियमांच्या परिपत्रकासह राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या परिपत्रकात नवीन जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. नव्या धाेरणानुसार परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वी पासून पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ७५ टक्के गुण असणे बंधनकारक आहे. दुसऱ्या नियमानुसार यापुढे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रतीवर्ष ३० लक्ष रुपये आणि पीएचडीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ४० लक्ष रुपयाची मर्यादा असेल.
विशेष म्हणजे राज्य सरकारने यापूर्वीच्या परिपत्रकातही काही जाचक अटी लावल्या हाेत्या. यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीही क्रिमिलेयरची संकल्पना लावून ८ लाख उत्पन्नाची मर्यादा लावली आहे. याशिवाय शैक्षणिक पात्रता ५५ टक्क्यावरून ७५ टक्के करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये असंताेष पसरला असताना आता आणखी जाचक अटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो घटनाबाह्य आहे.
नियामक मंडळ आणि सामाजिक न्याय विभागाने लावलेल्या घटनाबाह्य अटी अश्या आहेत.
- पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३० लाखापर्यंत शिष्यवृत्ती, तर पीएचडीसाठी ४० लाखापर्यंत शिष्यवृत्ती.
- दहावी, बारावी व पदवी अभ्यासक्रमात ७५ टक्के गुण अनिवार्य. पीएचडीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमात ७५ टक्के गुण आवश्यक. यापूर्वी ५५ टक्क्यांची मर्यादा हाेती.- ८ लक्ष रुपये उत्पन्नाची अट. यापूर्वी पहिल्या १०० विद्यापीठात प्रवेश मिळालेल्यांना उत्पन्नाची अट नव्हती.
- – एका कुटुंबातील एकच विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीस पात्र ठरेल. यापूर्वी कुटुंबातील दाेन मुले लाभ घेऊ शकत हाेती.- पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती घेतली तर पीएचडीसाठी मिळणार नाही.
अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संविधानिक सवलती आर्थिक मागासेपणाच्या निकषावर नाही तर सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र सरकारने समान धाेरणाच्या नावाखाली लावलेले उत्पन्नाचे, शैक्षणिक पात्रतेचे निकष घटनात्मक तत्वांशी जुळत नाही. सरकारने लावलेल्या जाचक अटी अनुसूचित जाती- जमातींवर अन्याय करणाऱ्या आहेत.तसेच त्यांना जाणिपूर्वक उच्च शिक्षण नाकरणारा नियम करण्यात आले आहेत.
दुर्बल वंचित घटकातील विध्यार्थी ह्यांना मुख्य प्रवाहात येऊ न देण्यासाठी आपण हा बेकायदा नियम केलेला आहे.
परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती जमाती जावू नये असाच नियामक मंडळाचा डाव दिसतो.
सबब आपणास कायदेशीर नोटीस बजावण्यात येत असून आठ दिवसात सामाजिक न्याय विभागाने हा निर्णय रद्द करावा अन्यथा सामाजिक न्याय विभागाचे विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देखील दिला आहे.लवकरच युवा आघाडी प्रदेश कमिटी पदाधिकारी आयुक्त आणि मुख्य सचिव ह्यांना भेटून निवेदन सादर करतील आठवड्यात निर्णय न झाल्यास युवा आघाडी प्रदेश सदस्य एडवोकेट अफरोज मुल्ला ह्यांचे मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल.
राजेंद्र पातोडे,
प्रदेश प्रवक्ता ,
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
9422160101
rajendrapatode@gmail.com
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत