पँथर विजय दादा वाकोडे काळाच्या पडद्याआड दैनिक जागृत भारत तर्फे भावपूर्ण आदरांजली

अतीशय दुःखद घटना…परभणी चा पँथर विजय वाकोडे काळाच्या पडद्याआड…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक आणि राजकीय चळवळीत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून कार्यकर्ते पुढे आले, परंतु परभणी जिल्ह्यातील अनेक लढवय्या नेत्यांचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे.
विशेषतः गावागावातील सामाजिक आणि धार्मिक जुलूमांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या लढवय्या नेत्यांनी आंबेडकरी चळवळ मजबूत केली.परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील लढवय्या नेता विजय वाकोडे साहेब (बाबा )यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
समाजासाठी लढणारा एक धाडसी लोकनेता हरपल्याची ही वेदना आहे.त्यांनी आंबेडकरवादी विचारांच्या प्रसारासाठी,सामाजिक न्यायासाठी आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.
आंबेडकरी चळवळीतील निडर,निर्भीड व झुंजार नेतृत्व काळाच्या पडद्याआड विजय वाकोडे (बाबा) पुन्हा होणे नाही अतिशय जड अंतकरणाने अखेरचा जयभीम बाबा परभणीकरांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो,हीच प्रार्थना.समाजातील परिवर्तनासाठी बाबाच्या योगदानाला नेहमीच स्मरण केले जाईल.
🛑”पँथर विजय वाकोडे” यांच्या “स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!!”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत