सी. डी चीमा पंजाब यांची मुलगी ,सुजाता सैनिक यांची राज्याचे पहिल्या मुख्य सचिव
सी. डी चीमा पंजाब यांची मुलगी ,सुजाता सैनिक यांची राज्याचे पहिल्या मुख्य सचिव पदी नियुक्ती,होत आहे
प्रथम त्या बाबत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
या पूर्वी रत्नाकर गायकवाड,हे मुख्य सचिव झाले होते
हे सांगण्याचे तात्पर्य हे की
ब्रिटिशांचे काळात Dr .बाबासाहेब आंबेडकर
यांनी ज्या 33विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण या साठी पाठवले होते त्या अनु.जाती चे दोन विद्यार्थी यांचे पाल्य IAS,महाराष्ट्र राज्या चे मुख्य सचिव या पदावर विराजमान होऊ शकले ,एक रत्नाकर गायकवाड आणि आता सुजाता सैनिक,Dr
बाबासाहेब यांची दूर दृष्टी
आणि शिक्षणा चे त्यांनी ओळखलेले महत्त्व
आपली माणस भले ही राजकारण व अर्थ कारण यात तुलनेत मागे असतील पणं आज शिक्षण क्षेत्रात महार धर्मांतरित बौद्ध यांनी जे झेप घेतली ,ते जागतिक इतिहासात नोंद घेण्या सारखी आहे.केवळ घटनेने दिलेले आरक्षण या मुळे ही प्रगती झाली असे नाही तर,
1956ला Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे धर्मांतर करून,जो मुल मंत्र दिला तो भला ही 100% follow झाला नसेल ,पण शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा
यातील शिका, या मूलमंत्राचा खूप मोठा परिणाम झालेला आहे,
शिका म्हणजे केवळ डिग्री घ्या असं नाही,
तारा सुशिक्षित व्हा,
सत्य,जाना, अंधश्रद्धा सोडून द्या, कर्मकांड सोडून द्या, यातून मिळालेला वेळ आणि वाचलेला पैसा, शिक्षणासाठी खर्च करा, आपला उद्धार आपणच करून घ्या, आता दीप भव, हा बुद्धाचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला,
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या इतर जाती, यांनीही जर
बाबासाहेबांचा संदेश ऐकला असता, तर त्यांची ही प्रगती अशीच झाली असती,
आता ही वेळ गेलेली नाही,
जोपर्यंत फुले शाहू, आंबेडकर, आपण स्वीकारणार नाही. तोपर्यंत आपले प्रगती होणार नाही. ते शिव करायचं की नाही, शिव करायचं आपण ठरवा,
पुन्हा एकदा सुजाता सैनिक यांचे अभिनंदन,
उत्तम सोनकांबळे
सेवानिवृत्त सहसंचालक, लेखा व कोषागारे संभाजीनगर, रा.नांदेड
30.6.2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत