’’भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव”

दिनांक ०७ जुलै २०२४ राेजी पिंपरी-पुणे येथे
रंगणार ’’भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव”
मी बोलताच त्यानं हंबरडा फोडला
भिडेवाडा बोलला, भिडेवाडा बोलला,
प्रत्यक्ष भिडेवाडयात मातीच्या ढिगा-यावर बसून भिडेवाडाकार कवी लेखक विजय वडवेराव यांनी सन २०१४ मध्ये लिहलेली कविता आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. आणि म्हणुनच श्री. विजय वडवेराव यांनी भिडेवाडा या विषयावर आधारीत आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे आयोजन दिनांक ०७ जुलै २०२४ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया मागे, पिंपरी-पुणे येथे आयोजीत केला आहे. सदर काव्य महोत्सवासाठी गुजरात, केरळ, कर्नाटक, गाेवा यासोबतच संपुर्ण महाराष्ट्रातुन तसेच विदेशातूनही जवळपास २०० कवी, कवयित्री सहभागी होणार आहेत. सदर काव्य महोत्सवात विविध ठिकाणांहून आलेले मान्यवर कवी त्यांच्या कवितांमधुन भिडेवाडयाचा इतिहास मांडतील. तसेच पुढील पिढीसाठी भिडेवाडयाचा इतिहास जतन करुन ठेवण्याचे माठे काम सदर काव्य महोत्सवातून होईल. श्री.विजय वडवेराव हे पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी भिडेवाडयासारख्या देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान असलेल्या, स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्र बिंदू असलेल्या ऐतिहासिक वास्तुबद्दल महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी शेख, वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल लोकांनी माहिती शोधावी, वाचन करावे, अभ्यास करावा व आशयघन लेखन करावे या एकमेव उद्देशाने मार्च २०२४ मध्ये भिडेवाडा बोलला या राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन देखील केले होते. तरुण पिढीला
डिजिटल व सोशल मिडीयाचे अतिशय आकर्षण असल्याने त्यांनाही भिडे वाड्याचा इतिहास माहीत व्हावा म्हणून विजय वडवेराव यांनी
भिडेवाडा काव्य जागर आंतरराष्ट्रीय फेसबुक व्हिडीओ अभियानही सुरु केले आहे. एक हजार व्हिडिओचे ध्येय आहे.
युटयुबवर या विषयाचे भिडे वाडा काव्य जागर अभियान हे स्वतंत्र चॅनलही त्यांनी सुरु केले आहे.
भिडे वाडयाचा इतिहास समाजात सर्वदूर पोहोचावा यासाठी विजय वडवेराव हे कोणाचेही कसलेही सहकार्य न घेता
स्व खर्चाने हे सगळे उपक्रम राबवत आहेत.
सन 2012 पासून आज पर्यंत गेली सतत 12 वर्षे भिडे वाडा बोलला कवितेच्या माध्यमातून जनजागृती, भिडे वाडा स्वछता अभियान, प्रत्यक्ष भिडेवाडयात एकमेव ऐतिहासिक कविसंमेलन, भिडे वाडा आंतर राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा आयोजन, भिडे वाडा काव्य जागर आंतर राष्ट्रीय फेसबुक व्हिडिओ अभियान, भिडे वाडा आंतर राष्ट्रीय काव्य महोत्सव असे विविध उपक्रम
कवी विजय वडवेराव राबवत आहेत व त्यांना समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत