“आम्ही जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केलेली नाही” -जरांगे पाटलांचे वक्तव्य

अहमदनगर: 23/11/2023
मराठा समाज आणि माझ्यात अतूट नातं तयार झालं आहे. त्यामुळे मराठा समाज माझ्या पाठिशी आहे. मी सर्वाधिक आनंदी आहे कारण लोक आमच्या समाजाला नावं ठेवत होते. मात्र आता मराठा आरक्षणासाठी जेवढे लोक एकत्र आले त्यामुळे सगळ्यांची तोंडं बंद झाली असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
आज मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर दौरा आहे. घरात कुणी काही बोललं तर दुसरा माणूस विचारतोच की असं का बोललास बाबा? तसंच आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही आता २४ डिसेंबर पेक्षा जास्त वेळ सरकारला देणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या समाजाला मी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. २४ तारखेनंतर काय करायचं तो निर्णय मी त्यांनाच विचारुन घेणार आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
थोड्याच वेळात ते श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता २४ तारखेपेक्षा एक दिवसही जास्त वाढवून देणार नाही असं पुन्हा एकदा सांगितलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत