कायदे विषयकमुख्यपानविचारपीठ

मनुस्मृती’ आणि महिला !


संकलन :- जगदिश काबरे.

१) “व्यभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” (मनुस्मृती, अध्याय ९वा. श्लोक १९)
२) “लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते, हे तिने कायम ध्यानात ठेवावे. [५/१५२]
३) “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [५/१५४]
४) “स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.” [९/१४]
५) “पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात.” [९/१५]
६) “नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते.” [९/४६]
७) “सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.” [२/१३]
८) “माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.” [२/१५]
९) “ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.” [३/८]
१०) “जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.” [३/११]
११) “नवऱ्याने बायकोसोबत एका ताटात जेवण करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.” [४/४३]
१२) “आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऐका. बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही
स्वतंत्रपणे करू नये.” [५/४७]
१३) “स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [५/४८]
१४) “पिता, पती, पुत्र यांच्या वेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.” [५/४९]
१५) “पति जरी रागावलेला असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.” [५/१५०]
१६) “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [५/१५४]
१७) “पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.” [५/१५५]
१८) “स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [५/१६२]
१९) “पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [५/१६८]
२०) “स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.” [५/१६६]
२१) “पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे, सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.” [६/२]
२२) “विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही.’ [६/३]
२३) “स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत.” [९/१३]
२४) “स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [९/१८]

     अशा ‘मनुस्मृती’ नावाच्या पुस्तकातील श्लोक अभ्यासक्रमात लावणेबाबत शैक्षणिक आराखड्यात उल्लेख आहे. 

    आपणां सर्वांस विनंती आहे कि , याला विरोध करण्यास्तव आपले लेखी म्हणणे शासनाला सादर करावे. 

   सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेचे लेटर हेड वापरून आपले अभिप्राय शासनाला कळवावेत , अशी विनंती आहे. संघटना नसेल तर आपण वैयक्तिकरित्या देखील कळवू शकता. 

????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!