मनुस्मृती की अधोगती
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी ( राजन)
काल ऑफिस लंच मध्ये
बोलता बोलता ती म्हणाली
बरे झाले बाई शालेय पाठ्यपुस्तकक्रमात
मनुस्मृती शिकवली जाणार
आपल्या पाल्यांना धर्माची शिकवण मिळणार
मुलांचं बौद्धिक विकास होणार
धर्माचे आचरण मुले लहानपणापासून करणार
ती मला सांगत होती
मी ऐकत होतो
आनंद मावत नव्हता तिच्या चेहर्यावरती
ती मला म्हणाली
तू खुश नाही का ?
तुला आनंद नाही झाला का?
शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली मनुस्मृती
मी म्हणालो
अग मला तर खूपच आनंद झाला
कारण मुलांना शाळेत मनुस्मृती शिकवली जाणार
मुलांचा मेंदू धर्मांध होणार
आता मुले बघ बनणार धर्म जातीचे प्यादी
उद्या मोठे झाल्यावर होणार कट्टरवादी
ती म्हणाली असे का म्हणतोस तू ?
मी म्हणालो
तू कधी मनुस्मृती वाचली का ग?
ती म्हणाली नाही ?
मी म्हणालो
म्हणूनच मनुस्मृतीचा तू उदोउदो करते
तू जर मनुस्मृती वाचली असती ?
का ? जाळली मनुस्मृती
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुला कळले असते
अग मनुस्मृती शिकून मुले कट्टर होणार
सांग ना नवरा मेल्यावर तू
सती जाणार ?
की टक्कल करून आयुष्यभर सडत जगणार ?
वडिलोपार्जित अन नवऱ्याच्या
संपत्ती वरचा तुझा तू हक्क सोडणार ?
रंडीबाज,बेवडा जुगारी नवऱ्याची
तू पतीदेव म्हणून सेवा करणार ?
सांग तू शिक्षणापासून वंचित रहाणार ?
नोकरी सोडून फक्त अन फक्त
मुलं पैदा करण्याची मशीन होणार ?
तू आज उंबरठ्या बाहेर आहे
मनुस्मृती नुसार तू उंबरठ्याच्या आत
कैदी दासी गुलाम होणार ?
तुझ्या स्वातंत्र्यावर गदा येणार
तुझा उंच झोका तुटून जाणार
संविधानाने दिलेले तुला अधिकार
क्षणात नष्ट होणार
धर्म जातीचा दलाल तुझा
राजरोस मानसिक बलात्कार करणार
ती स्तब्ध होऊन सारं ऐकत होती
मी म्हणालो
मनुस्मृती नुसार तू फक्त शूद्र असणार
ह्या देशात पुन्हा जातीवाद बोकाळणार
फक एक जात श्रेष्ठ
बाकी सर्व नीच शूद्र असणार
शिवाशिव सुरू होणार
पुन्हा शूद्रांना मंदिर प्रवेश नसणार
अग तुझ्या पाळीचा जो धर्म अन ग्रंथ
धरतो विटाळ
तरी तू त्या धर्माचे गाते गुणगान
अन ग्रंथाचे कुटते टाळ
अग तू तुझा मेंदू ठेवू नको गहाण
मनुस्मृती हवी की
हवे तुला संविधान
संविधान धर्मनिरपेक्ष, समता,बंधुता,आम्ही भारतीय शिकवते
बुद्धी तुझी जागृत कर आता तरी
मनुस्मृती सांगते
शूद्र गवार ढोर नारी
सब ताडन के अधिकारी
तुझ्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी स्वातंत्र्यासाठी
नको राहू खोट्या भ्रमात
तूच ठरव आता
मनुस्मृती की संविधान हवे शालेय पाठ्यपुस्तकक्रमात
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी ( राजन)
९१७२२ ९१४४८
२८/०५/२०२४
आपला अभिप्राय देण्यासाठी 9172291448 वर कॉल किंवा व्हाट्सआप करा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत