नळदुर्ग येथे कडक उन्हाळ्यात तहानलेल्या माणसाची तहान भागविण्या साठी 8 फार्मा सरसावली

नळदुर्ग येथे बसस्थानकात सामान्य माणसाला विश्रांती साठी सिमेंट बाकडाचा लोकार्पण सोहळा संपन्न .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
युवा नेते ,तुळजापूर तालुक्याचे भाग्यविधाते सुनील चव्हाण यांच्या वाढ दिवसानिमित्त, संजीवनी मेडिको नळदुर्ग व ८ फार्मा ग्रुप अणदूर यांच्या वतीने थंडगार जार च्या पाणपोई चे उदघाटन निमा संघटनेचे सचिव डॉ जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिवाय नळदुर्ग शहरात बसस्थानकात आस पास परिसरातून प्रवासा साठी आलेल्या प्रवाशांना थंडगार झाडांच्या फांद्याखाली भर उन्हात विश्रांती घेण्यासाठी कै मनोहरराव डुकरे यांच्या स्मारणार्थ तुळजा रुग्वेद इलेक्ट्रिकल व वैलभ सोलार यांच्या कडून सिमेंटचे डेक्स भेट कै इंदुबाई रामभाऊ पुदाले यांच्या स्मरणार्थ अनिल रामभाऊ पुदाले यांच्या कडून डेक्स भेट दिल्या मुळे नागरीकांची उत्तम सोय होणार आहे त्यामुळे नागरीक सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत सिमेंट टेबल पाणपोईचे उदघाटन करून ऐन उन्हाळ्यात भर उन्हात आलेल्या नागरीकांची खूप मोठी सेवा केली जाणार आहे
या वेळी एस टी चे वाहातुक नियंत्रक महेश [ दिपक ] डुकरे सामाजिक कार्यकर्ते अनिल पुदाले जेष्ठ पत्रकार विलास येडगे, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार तानाजी जाधव, पत्रकार उत्तम बनजगोळे, पत्रकार दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलचे संस्थापक मुख्य प्रवर्तक मारुती खारवे , दिशा बँकेचे शाखा व्यवस्थापक उमेश जाधव इंजमाम शेख , बसचे चालक संभाजी महाबोले , पत्रकार इरफान काझी , प्रविण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते, गेली १० वर्षांपासून पाणपोई नळदुर्ग शहरात कडक उन्हाळ्यात तहानलेल्या माणसाची तहान भागविण्यासाठी ८ फार्मा सरसावली आहे सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे ३० मार्च ते १५ मे पर्यंत ही पाणपोई लोकांसाठी उपलब्ध आहे, रुग्ण व ग्रामस्थांना भीषण उन्हाळ्यात थंडगार पाणी पाजण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे, सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले तर आभार ऋषभ जाधव यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ८ -फार्मा ग्रुप चे जीवन मोजगे, संजय जाधव, गोविंद शिंदे, गुणवंत मुळे, सचिन कासार, तेजस जाधव, प्रतीक किलजे,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत