
भारतीय लष्कर आज २४३ वा कोर ऑफ इंजिनियर्स डे साजरा करत आहे. यानिमित्त लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या निमित्त सर्व श्रेणीतील सैनिकांना तसंच माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लष्कराला लढाऊ अभियांत्रिकी साहित्य पुरवणे, सशस्त्र दल आणि इतर संरक्षण विभागांसाठी पायाभूत सुविधा पुरवणे, देशाच्या सीमेवरील संपर्क यंत्रणा बघणे तसंच नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदत करणे कोर ऑफ इंजिनियर्स हा विभाग करतो, अशी माहिती कोरचे प्रमुख अभियंता लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. ही सर्व कामे कॉम्बॅट इंजिनियर्स, मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिस, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि मिलिटरी सर्व्हे हे लष्कराचे चार स्तंभ पार पाडतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत