मराठा आरक्षण प्रकरणी सर्व पक्षीय बैठक.

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरपावली गावात आंदोलन करत असलेले मनोज जरांगे यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार सातत्याने करत आहे. शिष्टमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर देखील जरांगे आंदोलनावर ठाम आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून उद्या मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली असून सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट , काँग्रेस, मनसे यांच्यासह शिवसेनेच्या ठाकरे गटालाही बैठकीच निमंत्रण दिले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निमंत्रण स्विकारून बैठकीला येणार का…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत