कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथील निर्भयावरील अत्याचार आणि खून प्रकरणातील दोषी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या. शिक्षा भोगत असताना बराकीतच गळफास लावून केली आत्महत्या.
राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आपलं जीवन संपवलं. आज पहाटे गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. सुमारे पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ ला दोषी ठरविलं होतं. दरम्यान एवढ्या मोठ्या हत्याकांडातील मुख्य आरोपी गळफास घेऊन आत्महत्या करतो, तेव्हा जेल प्रशासन काय करत होतं? असा सवाल आता उपस्थित होतोय.
आरोपी जितेंद्र शिंदे याने आज पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्यानंतर काही वेळातच ही माहिती तुरुंग प्रशासनाला कळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. तुरुंग अधिकारी अमिताभ गुप्ताही थोड्या वेळातच येरवडा कारागृहात पोहोचणार आहेत. दरम्यान, आरोपी जितेंद्र शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेल्याची माहिती आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत