राजकीयसामाजिक / सांस्कृतिक

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास कुणबी महासंगाच राज्यभर आंदोलन.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून राज्यात गाजत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अजूनही सुरू आहे. तसेच या मुद्द्यावर चर्चेसाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. यादरम्यान कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी नागपूरमध्ये आजपासून कुणबी-ओबीसी संघटना आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीविरोधात कुणबी समाज आक्रमक झाला असून जर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर महाराष्ट्र पेटवू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

याच पार्श्वभूमिवर ‘सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समिती’च्या बॅनरखाली आज सकाळी 11 वाजतापासून नागपूर येथील संविधान चौकात कुणबी-ओबीसी समाजाकडून बेमुदत धरणे आंदोलन केलं जाणार आहे. सर्व कुणबी-ओबीसी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

तसेच ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, तसेच जातीनुसार जनगणना करावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण द्यावं. केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात येणार नाही.

जोपर्यंत सरकार जरांगे पाटलांची मागणीप्रमाणे सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असे जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे कुणबी ओबीसी संघटनानी जाहीर केलं आहे. १६ तारखेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात आला नाही तर १७ तारखेला सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!