महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

जग बदल घालूनी घाव ।सांगुनी गेले मज भीमराव ।।

जग बदल घालूनी घाव ।
सांगुनी गेले मज भीमराव ।।

गुलामगिरीच्या या चिखलात ।
रुतुन बसला का ऐरावत ।।

अंग झाडूनी निघ बाहेरी ।
घे बिनीवरती घाव ।।

धनवंतांनी अखंड पिळले ।
धर्मांधांनी तसेच छळले ।।

मगराने जणू माणिक गिळीले ।
चोर जहाले साव ।।

ठरवून आम्हा हीन अवमानीत ।
जन्मोजन्मी करुनी अंकित ।।

जिणे लादून वर अवमानीत ।
निर्मुन हा भेदभाव ।।

एकजुटीच्या या रथावरती ।
आरूढ होऊनी चलबा पुढती ।।

नव महाराष्ट्रा निर्मुन जगती ।
करी प्रगट निज नाव ।।

  • साहित्यकार अण्णाभाऊ साठे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!