देश-विदेशमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नवे आयुष्य वैद्यकीय सेवेला समर्पित करणार; भारतीय वंशांच्या विद्यार्थ्याचा निश्‍चय!

हृदयाची धडधड तब्बल सहा वेळा बंद पडूनही भारतीय वंशांच्या अमेरिकी विद्यार्थ्याला जीवदान मिळाले. अतुल राव असे त्‍याचे नाव असून ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेने (एनएचएस) त्याचे प्राण वाचविले आहेत. यामुळे लंडनमध्ये शिकणाऱ्या अतुलने वैद्यकीय क्षेत्रातच करियर करण्याचे निश्‍चित केले आहे.
अतुल राव हा अमेरिकेतील सिएटलमधील रहिवासी आहे. टेक्सास येथील बेलोर विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे. २७ जुलैला अतुल जमिनीवर पडलेला त्याच्या सहकाऱ्यांना दिसले. त्यांनी लंडनमधील इंपिरिअल कॉलेजशी संपर्क साधला.

त्यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी त्याच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर) त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मिनिटभरातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली आणि अतुलला ‘इंपिरिअल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्ट हॅमरस्मिथ हॉस्पिटल’च्या हृदयविकार केंद्रात दाखल करण्यात आले.
त्याच्या फुफ्फुसात रक्ताची गुठळी तयार झाल्याने त्याच्या हृदयातून रक्त प्रवाह थांबला. यालाच ‘पल्मनरी एम्बॉलिझम’ म्हणजे फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, असे म्हणतात. यामुळे अतुलची हृदयक्रिया बंद पडली.

त्याचा जीव वाचविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी रात्रभर पराकाष्ठाचे प्रयत्न केले. ‘एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन’ (ईसीएमओ) या जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्याची स्थिती उद्‍भवण्याची शक्यता गृहित धरून अतुलला सेंट थॉमस रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती. पण रक्ताच्या गुठळ्या फोडणारी औषधे आणि अन्य जीवरक्षक प्रणालीच्या मदतीने त्याची प्रकृती सुधारली आणि ‘ईसीएमओ’ देण्याची गरज भासली नाही.

मृत्यूच्या दाढेतून खेचून आणीत आयुष्य पुन्हा बहाल करणाऱ्या ‘एनएचएस’ प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतुल व त्याच्या आईवडिलांनी रुग्णालयाला नुकतीच भेट दिली. त्याचे वडील अजय राव हे अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. आई श्रीविद्या या सिॲटलमध्ये गणिताच्या प्राध्यापिका आहेत.
अतुलचा जीव वाचविण्यासाठी सांघिक प्रयत्नांना यश मिळाले. त्याला रुग्णालयापर्यंत आणण्यासाठी अनेकांनी मदत केली. या सर्व घटनेचा एक भाग बनणे आणि तुमच्या मदतीचा असा सकारात्मक परिणाम पाहणे हे अद्‍भूत आहे.

हृदयक्रिया बंद पडलेल्या अवस्थेत जेव्हा मी अतुलला पाहिले, तेव्हा तो वाचेल, अशी आशा वाटत नव्हती. पण आता त्याला पुन्हा भेटणे आणि त्याच्या आई-वडिलांशी बोलणे हा माझ्या १८ वर्षांच्या नोकरीतील अतिशय खास क्षण होता. – निक सिलेट, कर्मचारी, रुग्णवाहिका सेवा

‘‘ही घटना घडण्यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा माझा निर्णय योग्य आहे का? की व्यवसाय सुरू करावा अशी माझी द्विधा मनःस्थिती होती. पण उपचारांनंतर पण ज्या क्षणी मला जाग आली ते मला सर्व समजले. मला मिळालेले दुसरे आयुष्यात सकारात्मक गोष्टी करीत आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून इतरांची सेवा करायचा निश्‍चय मी केला,’’ असे अतुलने सांगितले. तो सध्या वैद्यकीय पदवीच्या शेवटच्या वर्षात आहे. या शाखेतील पुढील शिक्षणही तो घेणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!