साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार नॉर्वेचे साहित्यिक जॉन फॉस (वय ६४) यांना गुरुवारी जाहीर झाला. नॉर्डिक साहित्यविश्वात मुशाफिरी करणारे फॉस यांना नाट्य, कादंबरी व बालसाहित्यातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
‘‘फॉस यांचे साहित्य त्यांच्या अस्सल नॉर्वेजियन भाषेत आणि तेथील मातीतील आहे,’’ अशा शब्दात नोबेल साहित्य समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी त्यांचे कौतुक केले. फॉस हे त्यांच्या देशातील सर्वात गाजलेल्या नाटककारांपैकी एक असून त्यांनी ४० नाटकांसह कादंबऱ्या, लघुकथा, मुलांसाठी पुस्तके, कविता, निबंध असे वैविध्यपूर्ण व विपुल लेखन केले आहे.
‘नाही रे’ वर्गातील लोकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण नाटकांतून आणि लेखनातून आवाज मिळाला आहे, असे नोबेल पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकादमीने सांगितले. अकादमीचे सरचिटणीस मॅट्स माल्म यांनी फॉस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना नोबेल जाहीर झाल्याची माहिती दिली.
फॉस यांनी त्यांची पहिली कादंबरी ‘रेड अँड ब्लॅक’ ही १९८३ मध्ये प्रसिद्ध झाली असून त्यात आत्महत्येसारखा गंभीर व संवेदनशील मुद्दा हाताळला आहे. आत्महत्येसारखा गंभीर व संवेदनशील मुद्दा हाताळला आहे. त्यांचा जन्म १९५९ मध्ये नॉर्वेत झाला.
ते सात वर्षांचे असताना मोठ्या अपघातातून ते बचावले होते. त्यांच्या लिखाणावर या घटनेचा प्रभाव दिसतो. त्यांची पुस्तके ४० पेक्षा जास्त भाषांमधून अनुवादित झालेली आहेत. सुरुवातील त्यांना संगीताचीही आवड होती. ‘टेलिग्राफ’च्या जगभरातील १०० विद्वानांच्या यादीत फॉस ८३ व्या स्थानी आहेत.
जॉन फॉस यांनी त्यांच्या कथा-कादंबऱ्या आणि नाटकांमधून मानवाच्या अस्तित्वावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘ए न्यू नेम’ ही त्यांची कादंबरी म्हणजे सात पुस्तकांचा संग्रह आहे. यात एक वृद्ध आणि देवामधील संवाद वाचायल मिळतो.
नोबेल समितीकडून दूरध्वनी आल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला आणि नाहीही. हे घडू शकते या शक्यतेने मी सावधपणे गेल्या दहा वर्षांत स्वत: ला तयार केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे.
- जॉन फॉस, नोबेल विजेते लेखक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत