दैनिक जागृत भारत च्या वाचकांसाठी लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची सविस्तर आकडेवारी व माहिती.

लोकसभा 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. बंगालमध्ये सर्वात जास्त तर बिहार मध्ये सर्वात कमी मतदान झाले.
21 राज्यातील 102 जागांवर एकूण 1600 उमेदवार उभे होते. त्यांचं भवितव्य मतदारांनी ईव्हीएममध्ये बंद केलं. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. देशात सरासरी 59.71% मतदानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात आज पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 57.06 टक्के मतदान झालं. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर या मतदार संघात मतदान झालं.
मतदानात पश्चिम बंगालने बाजी मारली. पश्चिम बंगालमधअये तब्बल 77.57% टक्के मतदान झालं. तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. बिहारमध्ये 46.32 मतदान झालं. अंदमान आणि निकोबार: 56.87%, अरुणाचल प्रदेशः 63.26%, आसाम: 70.77%, बिहार: 46.32%, छत्तीसगड: 63.41%, जम्मू आणि काश्मीर: 65.08%, लक्षद्वीपः 59.02%, मध्य प्रदेश: 63.25%, मणिपूरः 67.46%, मेघालय: 69.91%, मिझोरम: 52.62%, नागालँड: 55.75%, तर पुद्दुचेरी: 72.84%, राजस्थान:50.27%, सिक्कीम: 67.58%, तामिळनाडूः 62.02%, त्रिपुरा: 76.10%,उत्तर प्रदेश: 57.54%, उत्तराखंड: 53.56%, पश्चिम बंगाल: 77.57% टक्के मतदान पार पडलं.
21 राज्यातील या 102 जागांवर 16.63 कोटी मतदार होते. यात 8.4 कोटी पुरुष, 8.23 कोटी महिला आणि 11,371 ट्रान्सजेंडर मतदार होते. 35.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार होते. 13.89 लाख दिव्यांग मतदारांचा समावेश होता. त्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती.
काही मतदारसंघात हिसेंच्या घटना घडल्या. बीजापूरमध्ये निवडणुकीसाठी तैनात असलेला सीआरपीएफ जवान देवेंद्र कुमार शहीद झाले. काही जणांनी इथ बॉम्ब स्फोट घडवले. यात देवेंद्र कुमार यांचं निधन झालं. मणिपूरमध्ये काही मतदार संघात फायरिंगच्या घटना घडल्या. पण यानंतरही लोकांनी मतदान केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत