जगात प्रधानमंत्री मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय – भाजपा नेते मधुकर चव्हाण

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या आड संभ्रमाची परिस्थिती निर्माण करून जनतेची सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात भाजपा चा हातखंडा आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारो करण्याची पातळी हळूहळू तीव्र होत चालली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये महायुतीने आजुन उमेदवार जाहीर केला नसला तरी बहुचर्चित अशा या मतदारसंघात भाजपने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला सुरुवात केली आहे. अशातच भाजपा चे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय” असे धक्कादायक विधान केलं आहे. भाजपच्या जेष्ठ नेत्याने केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान सध्या भाजपाचेच सरकार आहे, मधुकर चव्हाण यांनी केवळ सहानुभूती आणि मत मिळवण्यासाठी हवेत बाण मारण्यापेक्षा ही माहिती केंद्र सरकारला द्यावी व नेमका कोणता देश असा प्रयत्न करत आहे हे दाखवून देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी भावना जन माणसातून व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असे खळबळजनक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुहागरमध्ये महायुतीची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. यावेळी मधुकर चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
“सावध व्हा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली होईल या भीतीने जगात पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय,” असं मधुकर चव्हाण म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत