चीनने अरुणाचलप्रदेश सीमेवरील ५६ भागांची नावे बदलली- शरद पवार गटाचा खळबळ जनक दावा.


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये व्यस्त असताना अरुणाचल प्रदेशात मात्र भारत सरकारचे दुर्लक्ष होत असून “चीनने अरुणाचलप्रदेश सीमेवरील आतापर्यंत ५६ भागांची नावे बदलली आहेत” असा खळबळ जनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने केला आहे.
सत्ता राखण्यात मोदीजी इतके तल्लीन झालेत की, त्यांना चीनकडून भारतीय हद्दीत होणा-या कुरापती दिसेनाशा झाल्या आहेत असा टोलाही लगावण्यात आला आहे.
दरम्यान, चीनकडून अरुणाचलप्रदेश सीमेवरील नावे कोणत्या वर्षात, किती ठिकाणी बदलली गेली याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सांगितले की, २०२१ साली १५, २०२३ साली ११ तर २०२४ साली आत्तापर्यंत ३०, अशा गेल्या चार वर्षात ५६ ठिकाणांची नावे चीनने बदलल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया अकाऊंट द्वारे केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत