तैवान मध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; जनजीवन विस्कळित

जपान : तैवानच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागामध्ये तैपेई शहराला भूकंपाचे हादरे बसले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूकंपाची तीव्रता 7.2 ते 7.5 रिश्टर स्केल इतकी मापण्यात आली.
भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने एका क्षणात उभ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणं कोसळण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार हा भूकंप इतका मोठा होता की, त्यामुळं जपानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या अनेक बेटांनाही हादरा बसला. अधिकृत माहितीनुसार मागील 25 वर्षांमध्ये तैवानला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांपैकी हा सर्वात मोठा धक्का ठरला. जवळपास लाखापेक्षा जास्त घरांची वीज बंद झाली, रस्ते उखडले गेले व मोठ्या प्रमाणात इमारतींचे नुकसान झाले आहे.
तैवानमध्ये आलेल्या या भूकंपामध्य मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली असून, अनेक मोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या. दरम्यान, भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात झाल्याक्षणी नागरिकांनी घरांमधून पळ काढण्यास सुरुवात करत सुरक्षित ठिकाणी सगळ्यांनीच धाव मारली. अद्याप या संकटात कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त समोर नसून, सध्या भूकंप प्रभावित क्षेत्रात बचावकार्य तातडीनम सुरु करण्यात आलं असून, प्रभावित भागांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर, जखमींवरही प्रथमोपचार सुरु करण्यात आले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत